कोकण

रानभाजी पाककृती स्पर्धेत प्रिया घडशी प्रथम

CD

- rat२४p१.jpg-
26O59302
दापोली ः वणोशी येथील पाककृती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळालेल्या प्रिया घडशी यांना पारितोषिक देताना कृषी विद्यापीठाचे विषय विशेषज्ज्ञ डॉ. महेश कुलकर्णी व डॉ. रणजित महाडिक.
---
रानभाजी पाककृतीत ‘घडशी’ प्रथम
वणोशीत महोत्सव; लाडू, खीरीने वेधले लक्ष
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २४ ः पावसाळ्यात सहज उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांची ओळख नव्या पिढीला व्हावी, या उद्देशाने वणोशी येथे आयोजित ‘रानमाया’ रानभाजी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रसंगी घेण्यात आलेल्या पाककृती स्पर्धेत प्रिया घडशी यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत कृषी महाविद्यालय, दापोलीच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत कृषीस्नेही व कृषीसखी गट तसेच कृषी विस्तार शिक्षण विभागातर्फे या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनात सुमारे ४० प्रकारच्या रानभाज्यांचे नमुने मांडण्यात आले. रानभाज्यांचे पोषणमूल्य, आरोग्यविषयक महत्त्व, संवर्धन, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि विपणन याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. डॉ. आशिष शिगवण यांनी ‘रानमाया’ प्रदर्शनाची ओळख करून दिली. रानभाज्यांचा आहारातील वापर वाढावा यासाठी पाककृती स्पर्धाही घेण्यात आली. महिलांनी रानभाज्यांपासून सुमारे ४५ विविध नावीन्यपूर्ण पदार्थ तयार केले. रानभाजी लाडू, भारंगीची खीर, करटोली चिप्स, करटोली मोदक, रानभाजी समोसे, सुरणाचा हलवा आदी पदार्थांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. पाककृतींचे परीक्षण डॉ. प्रवीण झगडे व डॉ. आशिष शिगवण यांनी केले. प्रिया घडशी यांनी रानभाजी लाडू तयार करून प्रथम क्रमांक पटकावला. आदिती परांजपे यांच्या भारंगीच्या खिरीला द्वितीय तर वैशाली कदम यांच्या करटोली चिप्सला तृतीय क्रमांक मिळाला. सुरणाचा हलवा सादर करणाऱ्या तन्वी कदम, करटोली मोदक करणाऱ्या नियती गुरव आणि रानभाजी समोसे तयार करणाऱ्या सानिया आतपणे यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd T20I: वेस्ट इंडिजला आली लहर, केला कहर! भारताचे २५० धावांचे विक्रमी लक्ष्य सहज पार केले, शे होपचे नाबाद शतक

Beed News : विद्यार्थी खरेदी-विक्रीतून बोगस संचमान्येचा महाघोटाळा; चंपावती विद्यालयात आढळले उत्तराखंडचे ३ बोगस विद्यार्थी

Ganja Farm Seized : गाढेजळगाव शिवारात गांजाची शेती उघड; ४३० झाडे जप्त, १८ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल, शेतकरी आरोपीला अटक

IND vs WI 2nd T20I: W,W,W! ज्याने आस दाखवली, त्यानेच माती खाल्ली; Mayank Yadav च्या चूकीने मॅच गेल्यात जमा, नेमकं काय घडलं?

Delhi Protest: 30 हजार जवान तैनात अन् 200 जण ताब्यात; CJPच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत काय-काय घडतंय?

SCROLL FOR NEXT