कोकण

संकटांवर मात करत पायांनी फुलवले कलाविश्व

CD

- rat२४p६.jpg-
26O59310
पावस ः धीरज साठविलकर याचा सत्कार करताना अविनाश काळे.
---
संकटांवर मात करत पायांनी फुलवले कलाविश्व
धीरज साठविलकरची प्रेरणादायी वाटचाल ; गोळप कट्टा येथे मुलाखत
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २४ ः संकटं आली म्हणून कधीही खचून जाऊ नका. देवाने आपल्याला जे दिले आहे त्यात आनंद मानून प्रयत्न करत राहा, असा प्रेरणादायी संदेश अस्थिव्यंगावर आपल्या जिद्दीने मात करणारे बहुगुणी कलाकार धीरज साठविलकर यांनी दिला.
‘गोळप कट्टा’च्या ऑगस्ट मधील तिसऱ्या शनिवारी झालेल्या ८२व्या कार्यक्रमात अविनाश काळे यांनी साठविलकर यांची घेतलेली प्रकट मुलाखत उपस्थितांच्या मनाचा ताबा घेणारी ठरली. रत्नागिरीत जन्मलेल्या धीरज यांच्या आयुष्याची सुरुवातच संघर्षाने झाली. शारीरिक व्यंगामुळे सुरुवातीला अनेक शाळांनी प्रवेश नाकारला; मात्र, शिकण्याच्या जिद्दीपोटी गाडीतळ येथील अपंग, मूकबधिर शाळेत त्यांना प्रवेश मिळाला. अरुण फाटक या शिक्षकांनी स्वतः पायात खडू धरून त्यांना पायाने लिहिण्याची पहिली गिरणी घालून दिली. शाळेत जाताना आईला सहन करावा लागलेला लोकांचा रोष, नववीत भूमितीच्या समस्येमुळे आलेले अपयश अशा अनेक आघाड्यांवर धीरज यांनी मात केली. हार न मानता १७ नंबरचा अर्ज भरून त्यांनी ६५ टक्के गुणांसह दहावीची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली. घरच्या बिकट परिस्थितीमुळे कायद्याचे (लॉ) शिक्षण अर्धवट सोडावे लागले; पण त्यांनी स्वतःमधील कलेला आपले करिअर बनवले. कोणत्याही औपचारिक प्रशिक्षणाशिवाय केवळ जिद्द आणि निरीक्षणाच्या बळावर धीरज यांनी चित्रकला, क्ले मॉडेलिंग, मूर्तीकाम, गायन, अभिनय आणि वाद्य वाजवणे यांसारख्या विविध कलांमध्ये प्रावीण्य मिळवले. आजच्या काळात धीरज यांनी हार न मानता सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला आहे. युट्यूबवर अडीच लाख, इन्स्टाग्रामवर अडीच लाख आणि फेसबुकवर ५० हजारांहून अधिक फॉलोअर्स त्यांच्याशी जोडले गेले आहेत. आज त्यांची कला केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरही पोहोचली असून, अनेकजण त्यांना चित्रांच्या ऑर्डर्स देतात.
या कार्यक्रमाच्या शेवटी, धीरज यांचा सत्कार अविनाश वैद्य यांच्या हस्ते तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या आई-वडिलांचा सत्कार श्री. व सौ. आबा चिपळूणकर यांच्या हस्ते करण्यात आला.
---
उपस्थित झाले मंत्रमुग्ध
मुलाखतीदरम्यान उपस्थितांच्या आग्रहाखातर त्यांनी ‘आकाशी झेप घे रे पाखरा...’ हे गाणे गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तसेच अवघ्या पाच मिनिटांत पायाने गणपतीचे अप्रतिम चित्र रेखाटून उपस्थितांना थक्क केले. धीरज यांनी मधुबनी पेंटिंग, गणपती साकारणे आणि स्टोव्ह पेटवून मोदक बनवण्याच्या कौशल्याच्या सादरीकरणातून प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT