- rat२४p१२.jpg-
26O59317
गुहागर ः गुहागर आगाराला प्राप्त जिजाऊ बसेसच्या लोकार्पणाप्रसंगी उपस्थित पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर आणि अन्य.
गुहागरला मिळाल्या नव्या बसेस
प्रणव पोळेकर ः आणखी पाच दाखल होणार
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २४ ः ‘महायुती सरकारच्या माध्यमातून गुहागर आगाराला १० राजमाता जिजाऊ बसेस मंजूर झाल्या असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यात पाच बसेस मिळाल्या आहेत; उर्वरित पाच बसेसही लवकरच दाखल होतील,’ असे पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर यांनी सांगितले. तसेच, तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता पाच मिनिबसेसचीही मागणी परिवहन मंत्र्यांकडे केली आहे. त्याही लवकरच उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महायुती सरकार आणि परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून गुहागर आगाराला प्राप्त झालेल्या पाच नवीन राजमाता जिजाऊ बसेसच्या लोकार्पणावेळी ते बोलत होते. सभापती पोळेकर व उपसभापती नीलेश सुर्वे, जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर यांच्या हस्ते या बसेसचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले. यानंतर गुहागर ते मोडकाआगर अशी पहिली फेरी सोडण्यात आली. गणेशोत्सवापूर्वी प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेल्या या अत्याधुनिक बसेसचा तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले. या कार्यक्रमाला नगरसेवक अमरदीप परचुरे, अमोल गोयथळे, साईनाथ कळझुणकर, सचिन ओक, प्रभारी आगार व्यवस्थापक दीपक चव्हाण, वाहतूक निरीक्षक स्वप्नील शिंदे, लायन्स क्लबचे पदाधिकारी आणि महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.