-rat२४p१८.jpg-
26O59366
मंडणगड ः तुळशीतील मंदिर परिसरात स्वच्छता करताना विद्यार्थी.
---------
तुळशीतील मंदिर परिसरात स्वच्छता
आनंददायी शनिवार ; न्यू इंग्लिश स्कूलचे कौतुक
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २४ : तालुक्यातील तुळशी येथील न्यू इंग्लिश स्कूलतर्फे आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत तुळशी येथील श्री भैरवनाथ मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रद्धा नटे यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम उत्साहात पार पडला.
विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, श्रमदानाची आवड तसेच धार्मिक व ऐतिहासिक स्थळांबद्दल आदर निर्माण व्हावा या उद्देशाने हे अभियान आयोजित करण्यात आले होते. परिपाठानंतर नटे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर विद्यार्थी व शिक्षकांनी झाडू तसेच आवश्यक साहित्य घेऊन मंदिर परिसरात स्वच्छता केली. या वेळी मंदिराचा सभामंडप, बाहेरील प्रांगण तसेच परिसरातील रस्त्यांवर साचलेला पालापाचोळा, निर्माल्य व इतर कचरा विद्यार्थ्यांनी एकत्र केला. ग्रामस्थांच्या सहकार्याने संकलित कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. स्वच्छता अभियानानंतर विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छता हीच सेवा’ आणि ‘सुंदर गाव, माझे गाव’ अशा घोषवाक्यांतून स्वच्छतेबाबत जनजागृती केली. या उपक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक सुरेश कोतवाल, भरत गोताड, शिक्षकेतर कर्मचारी कैलास धाडवे, संदेश पारधी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.