59487
बँकिंग योजनांचा लाभ
घ्या ः डॉ. नौकुडकर
कणकवली, ता. २६ ः आपले कुटुंब सक्षम होण्यासाठी महाबँकेच्या विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ घेऊन ग्राहकांनी आपली आर्थिक प्रगती साधावी असे आवाहन प्रा.भरमू नौकुडकर यांनी केले.
येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतर्फे रिलॅक्स हॉटेल सभागृहात ग्राहक मेळावा झाला. यावेळी डॉ. नौकुडकर बोलत होते. यावेळी रत्नागिरी क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य अधिकारी उमेश शिंदे, संतोषकुमार आदी उपस्थित होते. प्रा. डॉ. नौकुडकर म्हणाले, आर्थिक प्रगतीचा मार्ग सुकर करण्यासाठी कर्ज हे एक अत्यंत प्रभावी साधन आहे. कर्ज घेतल्याशिवाय व्यवसायाचा विस्तार करणे किंवा नवीन आर्थिक उद्दिष्टे साध्य करणे शक्य होत नाही. त्यामुळे नागरिकांनी व व्यावसायिकांनी कर्ज घेण्यास संकोच करू नये. मात्र, मिळालेल्या कर्जाच्या रकमेचा विनियोग केवळ उत्पादक कारणासाठीच केला पाहिजे.
या मेळाव्यात झोनल अधिकारी संतोषकुमार यांनी बँकेच्या गृहकर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, शेती आणि व्यावसायिक कर्जाच्या विविध योजनांची विस्तृत माहिती दिली. इतर बँकांच्या तुलनेत महाराष्ट्र बँकेचे व्याजदर अत्यंत रास्त व परवडणारे असल्याने ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. याशिवाय अशोक बाणे व स्वप्नील गायकवाड यांनी कार लोन, गोल्ड लोन व व्यवसाय वृद्धीसाठीच्या कर्जाविषयी मार्गदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.