कोकण

राजापूरात ''नगराध्यक्ष श्री'' शरीरसौष्ठव स्पर्धा

CD

- rat२५p८.jpg-
P26O59507
राजापूर ः विविध व्यायाम प्रकार स्पर्धेतील विजेत्यांसमवेत नगराध्यक्ष हुस्नबानू खलिफे, व्यापारीसंघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर आणि मान्यवर.
---
राजापुरात शरीरसौष्ठव स्पर्धेचा थरार

पुढील वर्षी ‘नगराध्यक्ष श्री’ स्पर्धेची घोषणा

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २५ ः राजापूर नगरपालिका आणि हौशी शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या विविध व्यायाम स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांमध्ये यज्ञेश पेणकर, सिद्धेश शिंदे, सार्थक पवार, युवराज सुतार, प्रणय आयरे आणि दीपक देसाई यांनी आपापल्या गटांत उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात बोलताना नगराध्यक्षा अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे यांनी राजापूर नगर पालिकेच्या १५०व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून पुढील वर्षी जवाहर चौक येथे भव्य ‘नगराध्यक्ष श्री शरीरसौष्ठव स्पर्धा’ आयोजित करण्याची घोषणा केली. जवाहरचौकातील नगर पालिकेच्या पिकअपशेड सभागृहात हा पारितोषिक वितरण सोहळा झाला. या स्पर्धेचे हे २५वे वर्ष असून, क्रीडापटूंनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमादरम्यान उत्कृष्ट सेवापदक मिळाल्याबद्दल पोलिस निरीक्षक अमित यादव यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, नगरसेवक सिद्धांत जाधव, महेश शिवलकर, सुबोध पवार, दिलीप चव्हाण, पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते, प्रकाश नाचणेकर, राजू जोगले, डॉ. सुयोग परांजपे, राजापूर अर्बन बँकेचे संचालक दीनानाथ कोळवणकर आणि अशोक तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.
---
स्पर्धेचा निकाल असा (प्रथम, द्वितीय, तृतीय) ः
* दंड-बैठक प्रकार ः
- शालेय लहान गट : यज्ञेश पेणकर, युवराज पेणकर, समर्थ झिंबरे.
- शालेय मोठा गट: सिद्धेश शिंदे, स्वप्नील गोठणकर, प्रथम घाडी.
- खुला मोठा गट: युवराज सुतार, नैतिक चव्हाण.
* बैठका प्रकार ः
- मोठा गट : सार्थक पवार, प्रथम घाडी, युवराज सुतार, उत्तेजनार्थ: अनुराज चौधरी, विराज भोसले.
* बेंचप्रेस प्रकार : प्रणय आयरे, मुक्तासिद गोवळकर, दीपक चव्हाण. उत्तेजनार्थ: दीपक देसाई, वैभव बिर्जे.
* स्कॉटिंग प्रकार: दीपक देसाई, दुष्यंत पाथरे, ओंकार जड्यार. उत्तेजनार्थ : मुक्तासिद गोवळकर, चैतन्य बाणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission चे नवे शेड्यूल जाहीर! ऑक्टोबरपर्यंत बैठका, अंतिम रिपोर्ट आणि वाढीव पगार कधी?

IND vs SL 2nd Test: अरे, चाललंय तरी काय! यशस्वी, असिथानंतर आणखी एका खेळाडूवर ICC ने केली कारवाई; हे नवीन प्रकरण काय?

Dry Fruits Price: रक्षाबंधन, गणेशोत्सवाआधी खिशाला मोठा फटका! कांदा-साखर कमी होती की काय, आता ड्रायफ्रूट्सही महागले, वाचा नवे दर...

Raksha Bandhan 2026 Gift Ideas: बहिणीच्या चेहऱ्यावर हसू आणतील ‘या’ ८ गोष्टी; पाहा एका-पेक्षा-एक भन्नाट गिफ्ट आयडियाज

Marathi News Live Updates : सिद्धार्थ आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना ताप

SCROLL FOR NEXT