कोकण

शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळेना दराची साथ

CD

- rat२५p९.jpg-
26O59508
सावर्डे ः येथील बाजारात दहिवली, कोंडमळ्यातील शेतकरी भाज्यांची विक्री करताना.
---
गावरान भाजीला मागणीचा दुष्काळ!
दहिवली, कोंडमळा परिसरातून मोठी आवक; शेतकरीवर्ग चिंतेत
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. २५ ः चिपळूण तालुक्यातील सावर्डे बाजारपेठेत सध्या दहिवली आणि कोंडमळा परिसरातील स्थानिक शेतकऱ्यांनी पिकवलेल्या अस्सल गावरान भाज्यांची आवक सुरू झाली आहे. १५ ऑगस्टनंतर पाऊस ओसरताच शेतातील ताजी काकडी, कोवळी भेंडी, दोडका, कारली, पडवळ आणि या हंगामात विशेष आकर्षण ठरणारे ‘चिबुड’ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत; मात्र, भरपूर आवक असूनही ग्राहकांचा प्रतिसाद अतिशय थंड असल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.
सावर्डे येथील बाजारात सध्या गावरान भाज्यांचे दर ४० ते १०० रुपये प्रतिकिलोदरम्यान आहेत. मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये याच गावरान भाज्यांना दुप्पट-तिप्पट भाव मिळतो; परंतु वाहतुकीचा प्रचंड खर्च न परवडल्याने या लहान शेतकऱ्यांना स्थानिक सावर्डे बाजारावरच अवलंबून राहावे लागते. कोणताही मजूर न लावता, स्वतःच्या कुटुंबासह अहोरात्र शेतात घाम गाळून पिकवलेला भाजीपाला रस्त्याच्या कडेला विक्रीसाठी मांडला तरी ग्राहक भाव पाडून मागत आहेत. त्यातच अनेक ग्राहक रस्त्यावरील स्थानिक शेतकऱ्यांऐवजी दुकानांमधून परजिल्ह्यातून आलेली भाजी खरेदी करण्यास पसंती देत असल्याने दिवसअखेर स्थानिक शेतकऱ्यांचा माल पडून राहत आहे.
दसऱ्यापर्यंतचा हा काळ ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी हक्काच्या कमाईचा असतो. बियाणे पेरण्यापासून ते भाजी तोडण्यापर्यंतची सर्व कामे घरातील माणसे स्वतः करतात. या भाजीपाल्याच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशांवरच त्यांचा दैनंदिन घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि सणासुदीचा खर्च चालतो; मात्र, सध्या बाजार उठताना भाजी तशीच पडून राहत असल्याने घरखर्च कसा चालवायचा, असा बिकट प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. सणासुदीचे दिवस लक्षात घेता ग्राहकांनी परजिल्ह्यांतील भाजीऐवजी स्थानिक शेतकऱ्यांकडून रास्त दरात ताजी गावरान भाजी खरेदी करावी. ग्राहकांनी या कष्टकऱ्यांच्या घामाचा व कष्टाचा आदर केला तरच त्यांचा गणेशोत्सव खऱ्या अर्थाने आनंदात व गोड साजरा होईल, अशी भावना व्यक्त होत आहे.
------
कोट
शेतकरी अत्यंत मेहनतीने आपला माल बाजारात आणतात. आधीच दर ४० ते १०० रुपये किलोच्या दरम्यान असताना, ग्राहक मात्र कमालीची घासाघीस करतात. शहरातील बाजारपेठेत घासाघीस न करता चढ्या दराने भाजी घेणारे ग्राहक, ग्रामीण बाजारात मात्र शेतकऱ्यांच्या भाज्यांचे भाव पाडतात.’

- सुनीता जोईल, भाजीविक्रेती, दहिवली पुनवतवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT