कोकण

भडे वारपाटमधील मुले शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत

CD

एकशिक्षकी शाळेची गुणवत्तेची भरारी

भडे वारपाट मधील श्रीनिवास माने यांची मेहनतीला यश

सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २५ ः शिक्षकांना ऑनलाईन कामे, बीएलओ, पोषण आहार, निवडणुका अशा अशैक्षणिक कामांचा तणाव असतो, यावर मात करून लांजा तालुक्यातील भडे वारपाट क्र. ३ या एकशिक्षकी शाळेतील श्रीनिवास माने या शिक्षकाने इतरांसाठी आदर्श घालून दिला आहे. दुर्गम भागातील सर्वसामान्य मुलांना गुणवत्तेच्या शिखरावर पोहोचवतानाच शिष्यवृत्ती परीक्षेत दरवर्षी शाळेचा निकाल शंभर टक्के लागत आहे.
लांजा येथे २१ ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या केंद्रप्रमुखांच्या कार्यशाळेत शिक्षक माने यांचा शिक्षण विभागाच्यावतीने विशेष गौरव करण्यात आला. माने २०१९ मध्ये ‘भडे वारपाट क्र. ३’ या दरीमध्ये वसलेल्या, अत्यंत उतरणीच्या व दुर्गम भागातील शाळेत हजर झाले. या गावातील बहुतांश पालक मजुरी करून उदरनिर्वाह करतात. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी सर्वसामान्यांच्या मुलांना घडवले. अवघ्या सहा वर्षांत या शाळेतील तब्बल पाच विद्यार्थी ‘जवाहर नवोदय विद्यालया’साठी पात्र ठरले आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेत दरवर्षी शाळेचा निकाल १०० टक्के लागत असून, प्रत्येक वर्षी विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकत आहेत. गेल्या वर्षी चौथीचा पट अवघा पाच होता; सर्व पाच विद्यार्थी परीक्षेला बसले व पाचही पास झाले. त्यापैकी चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले असून, त्यांनी तालुक्यात प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक पटकावला आहे. गेल्या वर्षी पाचवीत असलेला एक एकमेव विद्यार्थी गुणवत्ता यादीत आला तर त्याच्या आधीच्या वर्षी पाचवीचा तीन पट असताना तिन्ही विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले होते. एकशिक्षकी शाळा असून, इतर सर्व प्रशासकीय व अशैक्षणिक कामे वेळेवर पूर्ण करूनही गुणवत्तेत यश कसे मिळवता येते, याचे प्रात्यक्षिक माने यांनी दाखवून दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dry Fruits Price: रक्षाबंधन, गणेशोत्सवाआधी खिशाला मोठा फटका! कांदा-साखर कमी होती की काय, आता ड्रायफ्रूट्सही महागले, वाचा नवे दर...

IND vs SL 2nd Test: अरे, चाललंय तरी काय! यशस्वी, असिथानंतर आणखी एका खेळाडूवर ICC ने केली कारवाई; हे नवीन प्रकरण काय?

कोल्हापुरात ‘होम मिनिस्टर’चा डंका! २,५०० हून अधिक महिलांनी औक्षण करत रचला विश्वविक्रम

Raksha Bandhan 2026 Gift Ideas: बहिणीच्या चेहऱ्यावर हसू आणतील ‘या’ ८ गोष्टी; पाहा एका-पेक्षा-एक भन्नाट गिफ्ट आयडियाज

Marathi News Live Updates : राहुल गांधी मांजरीत विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार

SCROLL FOR NEXT