कोकण

आज आदित्य ठाकरेंकडून पाहणी

CD

लोटे औद्योगिक वसाहतीची
आज आदित्य ठाकरेंकडून पाहणी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २५ : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे बुधवारी (ता. २६) रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते लोटे औद्योगिक वसाहतीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर उद्योगभवन येथे लोटे परिसरातील उद्योजकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, प्रलंबित प्रश्न आणि विविध मागण्या जाणून घेणार आहेत.
आदित्य ठाकरे सायंकाळी ४.३० वाजता लोटे औद्योगिक वसाहतीला भेट देणार आहेत. या वेळी औद्योगिक वसाहतीतील सद्यःस्थितीची पाहणी केल्यानंतर ते उद्योगभवन येथे उद्योजकांशी चर्चा करणार आहेत. औद्योगिक क्षेत्रासमोरील विविध समस्या तसेच उद्योजकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत या संवादात चर्चा होण्याची शक्यता आहे. लोटे औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधा, विविध स्थानिक प्रश्न आणि उद्योगांसमोरील अडचणी याबाबत उद्योजकांकडून आदित्य ठाकरे यांच्यासमोर मांडणी केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhada: लॉटरीची घरे घटणार? २० टक्के योजनेतील घरांवरून म्हाडा-पालिका पेच

Young Age Lifestyle Diseases: तिशीतच वाढतोय डायबेटीस-BPचा धोका! तरुणांच्या मेटाबॉलिक हेल्थमध्ये नेमकं काय बिघडतंय?

IND vs SL, 2nd Test: श्रीलंकेकडून फाईटबॅक! सोनल दिनूशाची शतकाकडे वाटचाल; भारत फॉलोऑन देणार?

Driving License: RTO मध्ये न जाता घरबसल्या बदला ड्रायव्हिंग लायसेन्सवरील पत्ता! जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

Nitin Gadkari Clarification : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्ती घेणार? कार्यालयाकडून अखेर मोठं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT