कोकण

महामार्गामुळे गावातील मूलभूत सुविधा विस्कळीत

CD

महामार्गामुळे मूलभूत सुविधा विस्कळीत
निढळेवाडी ग्रामस्थांची तक्रार; अपुरी कामे पूर्ण करा
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २६ ः निढळेवाडी गावातील विविध प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करावीत, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे गावातील मूलभूत सुविधा विस्कळीत झाल्या असून, संबंधित ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
महामार्ग चौपदरीकरणाच्या कामामुळे निढळेवाडी स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता आणि निढळेवाडी बसस्टॉपवरून गावात येणारी पाखाडी यांची कामे अद्याप अपूर्ण आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना दैनंदिन ये-जा करताना आणि अंत्यसंस्काराच्या वेळी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच, गावातील भेळेकरीण देवस्थान परिसरातील मोरी पूर्वीच्या जागेवरून हटवून दुसऱ्या बाजूला बसवण्यात आली आहे. मोरीच्या या चुकीच्या नियोजनामुळे पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नाही. परिणामी, अगदी हलका पाऊस झाला तरी संपूर्ण देवस्थान परिसर पाण्याखाली जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने आणि बांधकाम विभागाने ग्रामस्थांच्या या त्रासाची दखल घेऊन स्मशानभूमी रस्ता, गावातील मुख्य पाखाडी आणि देवस्थान परिसरातील पाण्याच्या निचऱ्यासाठी योग्य मोरीची व्यवस्था तातडीने करावी, अशी मागणी निढळेवाडी ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : लव्हस्टोरीतून एमपीएससीचा पेपर फुटला; प्रेमासाठी पेपर फोडल्याने यंत्रणा खडबडून जागी, असं काय घडलं?

गोड साखरेचा कडू इतिहास! युरोपातील राजे-महाराजे 'या' खास कारणासाठी करायचे साखरेचा वापर

कुकू कोहलींच्या अंत्ययात्रेत लेकीनं दिला खांदा; वडिलांना अखेरचा निरोप देताना करिश्मा कोहली भावूक

Panchganga Pollution: ‘एसटीपी’ उभारणीच्या दिरंगाईचा अहवाल द्या; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडेंचे आदेश; कोल्हापुरात येऊन पाहणी करणार

वैभव सूर्यवंशीच्या टेस्ट ड्रीमला मोठा धक्का? राहुल द्रविड यांनी सांगितली मोठी अडचण; म्हणाले, ‘अजून बराच पल्ला गाठायचा आहे’

SCROLL FOR NEXT