swt2610.jpg
59743
आरोस दांडेली ः अधिकाऱ्यांशी चर्चा करताना शरद धाऊसकर, कृष्णा पालयेकर, संदीप माणगावकर बाळा मोरजकर व इतर.
आरोस दांडेली गावासाठी
अखेर नवा ट्रान्सफॉर्मर
महावितरणकडून दखल ः समस्येवर तोडगा
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. २६ ः आरोस दांडेली गावात विजेचा लपंडाव सुरू असल्याने तसेच कमी-अधिक दाबाने वीजपुरवठा होत असल्यामुळे ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी माजी सरपंच कृष्णा पालेकर, संदीप माणगावकर व पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर यांच्या पाठपुराव्याने अवघ्या एका महिन्यात गावातील दाडेलीवाडीसाठी नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आला.
पालयेकर यांनी महावितरणकडे निवेदनाद्वारे ट्रान्सफॉर्मरची मागणी केली होती. पंचायत समिती सदस्य धाऊसकर व माणगावकर यांनीही पाठपुरावा केला. अखेर महिन्याभरातच दाडेलीवाडीसाठी ट्रान्सफॉर्मर मंजूर झाला. महावितरणचे अधिकारी श्री. ठाकूर यांनी दाडेलीवाडीत भेट देऊन जागेची पाहणी केली. श्री. धाऊसकर यांनी तातडीने काम पूर्ण करण्याचे आवाहन केले.
माजी सरपंच पालयेकर, माजी सरपंच नारायण उर्फ बाळा मोरजकर, दुर्गेश मोरजकर, सिद्धेश आरमारकर, ओंकार नाईक, हनुमंत पटेकर, गौरेश पाटकर, संदीप माणगावकर, सागर धाऊसकर, न्हावेली माजी सरपंच विठोबा गावडे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.