कोकण

कुडाळ येथे डिसेंबरमध्ये बहुभाषिक साहित्य संमेलन

CD

कुडाळ येथे डिसेंबरमध्ये बहुभाषिक साहित्य संमेलन
ओरोस, ता. २६ : ‘कोकणचे गांधी’ म्हणून ओळखले जाणारे आप्पासाहेब पटवर्धन यांच्या विचारांना आणि कार्याला अभिवादन करण्यासाठी डिसेंबरमध्ये कुडाळ येथे ‘कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन बहुभाषिक साहित्य संमेलन-२०२६’ आयोजित करण्यात येणार आहे. समृद्धी पब्लिकेशनच्या माध्यमातून होणाऱ्या या संमेलनात महाराष्ट्रासह विविध राज्यांतील साहित्यिक, कवी, लेखक तसेच नवोदित साहित्यिक सहभागी होणार आहेत. यात नोंदणीकृत १०० पुस्तकांचा प्रकाशन सोहळा, नवोदित साहित्यिकांच्या कविता, चारोळी संग्रह, कथा, कादंबरी, आत्मचरित्र, लेखमाला, ललितलेखन आदी साहित्यकृती प्रकाशित करण्यात येणार असून सहभागी साहित्यिकांचा सन्मानही करण्यात येणार आहे. संमेलनाच्या निमित्ताने ‘साहित्य गौरव’ हा विशेष ग्रंथही प्रकाशित करण्यात येणार आहे. या ग्रंथात सुमारे ५०० साहित्यिक, नवोदित कलाकार, सामाजिक कार्यकर्ते, बहुभाषिक साहित्यिक तसेच विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींचा परिचय समाविष्ट करण्यात येणार आहे. ग्रंथात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपला साहित्यिक व कार्यपरिचय सुमारे २०० शब्दांत आयोजकांकडे पाठवावा. ‘आपल्या लेखणीला व्यासपीठ आणि आपल्या कर्तृत्वाला सन्मान’ या संकल्पनेतून हे संमेलन आयोजित करण्यात येत आहे. इच्छुक साहित्यिक, लेखक, कवी तसेच विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींनी समृद्धी पब्लिकेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT