कोकण

राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेत खारेपाटणचा ''स्नेहसखी'' विजेता

CD

swt२६१७.jpg
५९८०५
ठाणे ः राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेत विजेत्या स्नेहसखी ग्रुपच्या महिला सदस्य.

मंगळागौर स्पर्धेत ‘स्नेहसखी’ विजेता
तळेरे : खारेपाटण रामेश्वरनगर येथील ‘स्नेहसखी’ महिला ग्रुपने ठाणे येथे आयोजित राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. पारंपरिक फुगडीचे आकर्षक, तालबद्ध आणि सांघिक सादरीकरण करत या संघाने उपस्थितांची मने जिंकली. राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धा मंगळवारी (ता. २५) ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे झाली. या स्पर्धेत राज्यभरातील एकूण २० संघांनी सहभाग घेतला होता. पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत सादर करण्यात आलेल्या फुगडीतील लयबद्ध हालचाली, सांस्कृतिक सादरीकरण आणि समन्वयामुळे खारेपाटणच्या स्नेहसखी ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या संघाला ३१ हजार रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. बक्षीस वितरण वृषाली वाघुले यांच्या हस्ते करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : लव्हस्टोरीतून एमपीएससीचा पेपर फुटला; प्रेमासाठी पेपर फोडल्याने यंत्रणा खडबडून जागी, असं काय घडलं?

गोड साखरेचा कडू इतिहास! युरोपातील राजे-महाराजे 'या' खास कारणासाठी करायचे साखरेचा वापर

कुकू कोहलींच्या अंत्ययात्रेत लेकीनं दिला खांदा; वडिलांना अखेरचा निरोप देताना करिश्मा कोहली भावूक

Panchganga Pollution: ‘एसटीपी’ उभारणीच्या दिरंगाईचा अहवाल द्या; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडेंचे आदेश; कोल्हापुरात येऊन पाहणी करणार

वैभव सूर्यवंशीच्या टेस्ट ड्रीमला मोठा धक्का? राहुल द्रविड यांनी सांगितली मोठी अडचण; म्हणाले, ‘अजून बराच पल्ला गाठायचा आहे’

SCROLL FOR NEXT