कोकण

मराठा समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा आज बांद्यात सत्कार

CD

मराठा समाजातील कर्तृत्ववान
व्यक्तींचा आज बांद्यात सत्कार
बांदा, ता. २६ : मराठा समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यासाठी बांदा येथे विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या (ता.२७) सकाळी ११ वाजता बांदा देऊळवाडी येथील बांदा विकास सोसायटीच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
या सोहळ्यात समाजातील कर्तृत्ववान व्यक्ती तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड झालेले ज्ञानेश्वर सावंत, राज्यस्तरीय निर्भीड पत्रकार पुरस्कार प्राप्त पत्रकार नीलेश मोरजकर आणि भाजप बांदा युवा शहर अध्यक्षपदी निवड झालेले विकी कदम यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. समाजासाठी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे नियोजन समाजातील मार्गदर्शक मकरंद तोरस्कर, शामसुंदर धुरी, गुरुनाथ सावंत आणि विनोद सावळ यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे. या सत्कार सोहळ्यास मराठा समाजातील बांधव, पदाधिकारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Political Earthquake : ऐन निवडणुकीच्या तोंडावर आणखी एका पक्षात उभी फूट! १२ पैकी ८ आमदार भाजपच्या गोटात; विधानसभेतील समीकरणे बदलली!

Vidhan Bhavan Row : विधानभवनात व्हिजिटर पासेसवरून मोठा वाद! उपसभापती सचिन अहिर आणि उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंच्या अधिकारांना कात्री

Latest Marathi News Live Update : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : महसूलमंत्री बावनकुळे

IND vs WI 5th T20I: ५-५ षटकांचा सामना? पावसाचा धुमाकूळ... किती वाजता टॉस, मॅचची वेळ... घ्या जाणून Cut off टाईम...

VIDEO : सरप्राइज देण्यासाठी अचानक घरी पोहोचली लेक; आईची प्रतिक्रिया पाहून नेटकरीही भावूक

SCROLL FOR NEXT