कोकण

-गणेशोत्सवात माल वाहतूक स्थगित करा

CD

गणेशोत्सवात रो-रो, मालगाड्या थांबवा
कोकण विकास समिती; विशेष गाड्यांमुळे मार्गावर ताणाची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २६ : गणेशोत्सवाच्या काळात कोकण रेल्वेमार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी होणार असल्याने या कालावधीत रो-रो सेवा तसेच जड मालवाहतूक गाड्या तात्पुरत्या स्थगित कराव्यात, अशी मागणी कोकण विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी कोकण रेल्वे प्रशासनाला निवेदन पाठवले आहे.
२४ ऑगस्टला रात्री सुमारे १० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास गोव्यातील वेर्णा येथे ट्रक घेऊन जाणाऱ्या रो-रो मालगाडीचे काही डबे रुळांवरून घसरल्याची माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे कोकण रेल्वेमार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाल्याची माहितीही समोर आल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे. मात्र, या घटनेबाबत कोकण रेल्वेकडून अधिकृत माहिती अथवा निवेदन अद्याप प्रसिद्ध झालेले नाही.
गणेशोत्सवाच्या काळात कोकण रेल्वेमार्गावर नियमित गाड्यांसह मोठ्या संख्येने विशेष गाड्या धावणार आहेत. त्यामुळे मार्गाच्या क्षमतेवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. अशा काळात मालवाहतूक गाडीला अपघात झाल्यास किंवा तांत्रिक कारणामुळे ती मार्गावर अडकल्यास प्रवासी गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होऊन हजारो प्रवाशांना फटका बसू शकतो, अशी भीती समितीने व्यक्त केली आहे. गणेशोत्सवातील गर्दी लक्षात घेता १० ते १४ सप्टेंबर तसेच १७ ते २० सप्टेंबर या कालावधीत रो-रो सेवा व इतर जड मालवाहतूक गाड्या तात्पुरत्या स्थगित करण्याबाबत गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. उपलब्ध मार्गक्षमता शक्य तितकी नियमित व विशेष प्रवासी गाड्यांसाठी राखून ठेवावी, अशीही मागणी आहे.
कोकण रेल्वे ही गणेशोत्सवाच्या काळात लाखो कोकणवासियांसाठी महत्त्वाची वाहतूक व्यवस्था आहे. त्यामुळे या कालावधीत मार्गाची विश्वसनीयता, वेळपालन आणि प्रवासी सेवा सुरळीत राहण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे दरेकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT