कोकण

वेलदूर मार्गावर रानवीत मोकाट गुरांचा ठिय्या

CD

रानवीत मोकाट गुरांचे संकट
अपघातात वाढ ; वाहनचालक त्रस्त
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २६ ः गुहागर तालुक्यातील वेलदूर मुख्य मार्गावरील रानवी येथे दररोज रस्त्यावर ठिय्या मांडणाऱ्या शेकडो मोकाट गुरांमुळे वाहनचालक अत्यंत त्रस्त झाले आहेत. एका बाजूला रस्त्यावरील खड्ड्यांचे साम्राज्य आणि दुसऱ्या बाजूला रस्त्याच्या मधोमध ठिय्या मांडून बसलेली गुरे, अशा दुहेरी संकटाचा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने येथे रोजच अपघातांची मालिका सुरू आहे.
रानवी परिसरातील रस्त्यावर मोठ्या गुरांसह छोटी वासरेही रस्त्याच्या मधोमध उभी असतात किंवा ठाण मांडून बसलेली असतात. या मार्गावर पथदिव्यांची कोणतीही सोय नसल्याने रात्रीच्या वेळी अंधारात बसलेली गुरे वाहनचालकांच्या सहजासहजी निदर्शनास येत नाहीत. त्यामुळे वाहने थेट गुरांवर धडकून गंभीर अपघात घडत आहेत. आरजीपीपीएल व इतर कंपन्यांमधील शेकडो कामगार याच मार्गावरून दररोज प्रवास करत असून, त्यांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. अनेकदा मोकाट गुरांचा अपघात झाल्यानंतर नुकसानभरपाई वसुलीसाठी त्यांचे मालक तत्काळ पुढे येतात आणि वाहनधारकांकडे हजारो रुपयांची मागणी करतात; मात्र, याच मोकाट गुरांमुळे वाहनांचे नुकसान झाल्यास अथवा चालक जखमी झाल्यास ‘ही आमची गुरेच नाहीत’ अशी सोयीस्कर भूमिका घेतली जाते. गुरांच्या मालकांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे आणि निष्काळजीपणामुळे वाहनचालकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
------
प्रशासकीय कारवाईची मागणी
मोकाट गुरांच्या या गंभीर समस्येबाबत नागरिकांनी व वाहनधारकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. प्रशासनाने या प्रकरणी तातडीने लक्ष घालून मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा, मालकांवर दंडात्मक कारवाई करावी आणि रस्त्यावरील पथदिव्यांची सोय करून होणारे अपघात टाळावेत, अशी मागणी वाहनचालकांची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT