कोकण

तालुक्यात ईद उत्साहात साजरी

CD

- rat२७p३.jpg-
26O59945
चिपळूण : शहरात ईद-ए-मिलादनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी सहभाग घेऊन शुभेच्छा दिल्या.
---
चिपळुणात ईद उत्साहात साजरी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २७ ः चिपळूण तालुक्यात मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलादचा सण उत्साहपूर्ण आणि धार्मिक वातावरणात साजरा केला. पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त चिपळूण शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
चिपळूण शहरातील मुस्लिम मोहल्ल्यातून ईद-ए-मिलादनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीदरम्यान धार्मिक आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात आला. चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी मिरवणुकीला भेट देत मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या. ईद-ए-मिलादनिमित्त शहरातील मशिदी तसेच परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. कुरआन पठण, दुवा, धार्मिक प्रवचन यांसह विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. पैगंबर मोहम्मद यांच्या जीवनातील मानवता, शांतता, बंधुभाव आणि समाजकल्याणाचा संदेश या वेळी देण्यात आला. तालुक्यातील सावर्डे, खेर्डी, पोफळी, अलोरे, नायशी आणि पिंपळी येथील मुस्लिम समाजाच्यावतीनेही ईद-ए-मिलादनिमित्त विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक उपक्रमांमधूनही सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT