कोकण

जिल्ह्यातील 1,499 शेतकऱ्यांना दुसरा हप्ता

CD

कर्जमाफीचा दुसरा हप्ता खात्यात जमा
जिल्ह्यातील १,४९९ शेतकरी पात्र ; ७.८९ कोटींचा लाभ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ ः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पहिल्या यादीतील पात्र शेतकऱ्यांचा दुसरा हप्ता त्यांच्या खात्यात जमा केला आहे. दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील १ हजार ४९९ शेतकऱ्यांना ७ कोटी ८९ लाख २९ हजार ७४२ रुपये वितरित केले आहेत.
महाराष्ट्र शासनाने नैसर्गिक संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवण्यात येत आहे. या द्वारे पात्र शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ७ हजार २९ शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले होते; मात्र आधार प्रमाणीकरण झालेल्या २ हजार ८३२ शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीचे १२ कोटी ९३ लाख ६८ हजार ६७८ रुपये जमा झाले आहेत. अद्याप २ हजार ५१८ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळालेला नाही. ॲग्रीस्टॅक नसणे, मृत लाभार्थी, देवस्थान इनाम जमिनी, परगावी/स्थलांतरीत शेतकरी, वयोमानामुळे ठसे जुळत नाहीत, जमीन नावावर नाही तसेच अन्य सात कोटींचा दुसरा हप्ता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील १ हजार ४९९ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यांच्या बँकखात्यात ७ कोटी ८९ लाख २९ हजार ७४२ रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात एकूण ४ हजार ३३१ शेतकरी लाभार्थी ठरले असून, २० कोटी ८१ लाख ९८ हजार ४१० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत.
---
प्रोत्साहनपर अनुदान
नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ५० हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. कारणामुळे हे शेतकरी पात्र असतानाही कर्जमुक्ती योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवण्यापासून वंचित राहिले आहेत; मात्र जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली उपनिबंधक कार्यालयाकडून लाभार्थी शेतकऱ्यांचा पाठपुरावा करून त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी कागदपत्रे अद्ययावत करण्याची सूचना करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT