कोकण

टिळक आळीत शिबिर

CD

टिळक आळीत
महाआरोग्य शिबिर
रत्नागिरी : श्री मारुती गणपती पिंपळपार देवस्थान, टिळक आळी गणेशोत्सव मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा टिळक आळी गणेशोत्सवाचे १०१वे वर्ष आहे. यामध्ये नंदादीप आय हॉस्पिटलच्या सहकार्याने रक्तदान शिबिर होणार आहे. तसेच या वेळी डोळे तपासणी, रक्त तपासणी, हाडांची तपासणी होणार आहे. शिबिर ३० ऑगस्टला सकाळी ९ वाजता टिळक स्मारक, उत्सव मंडपाशेजारी, टिळक आळी, रत्नागिरी येथे होणार असून या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन टिळक आळी गणेशोत्सव मंडळातर्फे करण्यात आले आहे.


परीक्षा केंद्रावर
प्रतिबंधात्मक आदेश
रत्नागिरी ः देवरूखजवळील आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिक महाविद्यालयात ३० ऑगस्टला सकाळी ८ ते दुपारी २ वाजता या कालावधीत नीट पीजी २०२६ परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षाकेंद्राचे १०० मीटरच्या परिसरात परीक्षेच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेच परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. केंद्राच्या परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा होईल असे कृत्य करण्यात येणार नाही. १०० मीटर परिसरातील एसटीडी बूथ, झेरॉक्स सेंटर, टायपिंग सेंटर, ध्वनिक्षेपण इ. माध्यमे आदेशांची मुदत संपेपर्यंत बंद राहतील. केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, सेल्युलर फोन, फॅक्स, ई-मेल व इतर प्रसारमाध्यमे घेऊन प्रवेश करण्यास मनाई असेल.


- ratchl२७१.jpg
P26O60011
मंगेश पांचाळ

मंगेश पांचाळ यांना
राष्ट्रीय पुरस्कार
चिपळूण ः तालुक्यातील कुटरे ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी मंगेश पांचाळ यांना स्टार्टअप शिक्षा फाउंडेशन नवी दिल्ली यांच्यावतीने डॉ. भीमराव आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. पांचाळ हे मूळचे राजापूर तालुक्यातील बागवेवाडी येथील रहिवासी आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये ते ३२ वर्षे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. लोकाभिमुख कार्यरत असणारे ग्रामपंचायत अधिकारी पांचाळ यांना क्रिकेट व गायनाची आवड आहे. युट्युबवर देखील त्यांचे भजन प्रसिद्ध आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा असून, त्यांना यापूर्वी अनेक संस्थेमार्फत पुरस्कार मिळालेले आहेत. नुकतेच त्यांना छत्रपती शिवाजी महाराज जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आता जाहीर झालेला पुरस्कार हा मानाचा पुरस्कार असून, डॉ. भीमराव आंबेडकर यांना अभिप्रेत असणारे कार्य आपण करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री शहरातील मोकळ्या जागा, क्रीडांगणे आणि मनोरंजनासाठीची मैदाने आमदारांना आणि बिल्डर मित्रांच्या हवाली करत आहेत - आदित्य ठाकरे

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

Mumbai News: सी लिंकला 'तारीख पे तारीख'! 'वांद्रे-वर्सोवा'साठी चार टप्प्यांत १,४२१ दिवसांची मुदतवाढ

Delhi Alert: 60 किलोमीटरच्या वेगाने दिल्लीच्या दिशेने येतेय वादळ! 'नोएडा'सह लगतची शहरं अंधारात

SCROLL FOR NEXT