कोकण

-बेकायदा वाळू वाहतूक व विना नंबर प्लेट वाहनांवर बडगा

CD

नियम मोडाल तर कारवाई अटळ
राजवर्धन करपे ः बेकायदा वाळू वाहतुकीवर लक्ष
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : जिल्ह्यातील बेकायदा वाळू वाहतूक, महसूल विभागाचे दुर्लक्ष आणि नंबर प्लेट नसलेल्या वाहनांच्या गैरवापराबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची गंभीर दखल घेत उप प्रादेशिक परिवहन विभागाने धडक कारवाई केली. आरटीओच्या ‘वायुवेग पथका’मार्फत नियमित तपासणी मोहीम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जात असून, आतापर्यंत १ कोटी ५१ लाख रुपयांपेक्षा अधिक दंड वसूल करण्यात आल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी दिली.
ओव्हरलोड (क्षमतेपेक्षा जास्त भार) वाहतूक करणाऱ्या वाहनांवर विभागाने मोठी कारवाई केली आहे. एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या वर्षभराच्या कालावधीत ४ हजार ९७२ वाहनांची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये दोषी आढळलेल्या ३५५ वाहनांकडून तब्बल १ कोटी १३ लाख ५९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर चालू आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल २०२६ ते जुलै २०२६ या अवघ्या चार महिन्यांच्या काळात २ हजार २७४ वाहनांची तपासणी करून दोषी ठरलेल्या १९२ वाहनांकडून ३५ लाख ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
यासोबतच विनानंबरप्लेट फिरणाऱ्या वाहनांवरही आरटीओने दंडाचा बडगा उगारला आहे. गेल्या वर्षात (एप्रिल २०२५ ते मार्च २०२६) तपासणी केलेल्या ५ हजार ८४४ वाहनांपैकी १८३ दोषी वाहनांकडून १ लाख ८८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. तर एप्रिल ते जुलै २०२६ या चार महिन्यांत १ हजार ७५ वाहनांची तपासणी करून दोषी आढळलेल्या १४७ वाहनांकडून ६० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सर्व वाहतूकदारांनी नियमांचे काटेकोर पालन करावे यासाठी विभागामार्फत सातत्याने जनजागृती व प्रबोधन मोहीमही राबवण्यात येत असल्याचे करपे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: दरवाजात उभं राहण्यावरुन वाद, रागात तरुणाला धावत्या लोकलमधून खाली ढकललं; बोरीवली स्थानकात थरार

Viral Video: स्टंपची अदलाबदल केली राव, तरी विकेट काही मिळेना! ध्रुव जुरेलचा भन्नाट जुगाड; VIDEO तुफान व्हायरल

Nepal Flood: नेपाळमध्ये जलप्रलय! ठाण्यातील नऊ पर्यटक बेपत्ता, तर रायगडमधील ३७ जण अडकले

Marathi News Live Updates : नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे मृतांची संख्या ५३८ वर पोहोचली

Aundha Nagnath Temple Plan : औंढा नागनाथ मंदिराच्या कायापालटासाठी 193 कोटी मंजूर! CM फडणवीसांचे संवर्धनाबाबत मोठे निर्देश, 'कल्याणेश्वर'सह 'शिवसृष्टी'साठी कोट्यवधींचा निधी

SCROLL FOR NEXT