कोकण

रत्नागिरीत कर्णकर्कश बुलेट स्वारांना इंगा

CD

rat२८p४.jpg
६०१७१
रत्नागिरीः कर्णकर्कश आवाज करत शांतताभंग करणाऱ्या दुचाकीस्वारांवर शहर पोलिसांनी कारवाई केली.

दुचाकीच्या कर्णकर्कश आवाजाला पायबंद
रत्नागिरी शहर पोलिस ‘ॲक्शन मोड’वर; २९ हजार रुपयांचा दंड वसूल
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ ः शहरात बेकायदेशीररीत्या बदल केलेली ध्वनिनियंत्रके बसवून कर्णकर्कश आवाज करत दुचाकी चालवणाऱ्या हुल्लडबाजांविरोधात रत्नागिरी शहर पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरू केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० उच्चक्षमतेच्या दुचाकींवर कारवाई करून पोलिसांनी २९ हजार रुपये दंड वसूल केला. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे रात्रीच्या वेळी शहरात कर्णकर्कश आवाज करत दुचाकी चालवणाऱ्यांना चाप बसण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी शहरातील मुख्य रस्ते, चौक आणि निवासी भागांमध्ये उच्चक्षमतेच्या दुचाकींमध्ये बेकायदेशीरपणे बदल केलेली ध्वनिनियंत्रके बसवून भरधाव वेगात गाड्या चालवण्याचे प्रमाण वाढले होते. या गाड्यांमधून निघणाऱ्या कानठळ्या बसवणाऱ्या व फटाक्यांसारख्या आवाजामुळे नागरिक त्रस्त झाले होते. विशेषतः लहान मुले, वृद्ध, रुग्ण आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर याचा गंभीर परिणाम होत होता. तसेच, रात्रीच्या वेळी शहरात हुल्लडबाजी करणाऱ्या या चालकांमुळे शांततेचा भंग होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात होता.
नागरिकांनी या वाढत्या त्रासाबाबत शहर पोलिसांकडे थेट तक्रारी नोंदवल्यानंतर पोलिस प्रशासनाने या समस्येची गंभीर दखल घेतली. त्यानुसार परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक अभिजीत थोरात आणि रत्नागिरी शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शहरात विशेष नाकाबंदी व तपासणी मोहीम हाती घेतली. या कारवाईदरम्यान नियमबाह्य आणि कर्कश सायलेन्सर बसवलेल्या १० दुचाकींवर तत्काळ दंडात्मक कारवाई करण्यात आली. संबंधित दुचाकीचालकांकडून जागेवरच २९ हजार रुपयांचा सक्त दंड वसूल करण्यात आला तसेच सायलेन्सर बदलण्याचे निर्देश देण्यात आले.
दरम्यान, काल (ता. २७) रात्री अचानक ही कारवाई सुरू झाल्यामुळे दुचाकी चालकांमध्ये चलबिचल सुरू झाली होती. काहींनी कारवाईचा बडगा चुकवण्यासाठी मुख्य मार्ग वगळून अन्य मार्गाचाही अवलंब केला. या कारवाईमुळे रात्रीच्यावेळी कर्णकर्कश आवाज करत दुचाकी चालवणाऱ्यांना चाप बसला आहे.

चौकट १
कारवाई आणखी तीव्र करणार
शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि नागरिकांची शांतता अबाधित राखण्यासाठी ही विशेष मोहीम आगामी काळात अधिक तीव्र स्वरूपात सुरूच राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. बेकायदेशीर बदल केलेल्या दुचाकी आढळल्यास थेट कायदेशीर कारवाईसह वाहने जप्त करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. शहर पोलिसांच्या या धडक भूमिकेचे शहरातील नागरिकांमधून आणि ज्येष्ठ नागरिकांकडून जोरदार स्वागत केले आहे.

चौकट २
60270

असा वाढतो दुचाकीचा आवाज
बुलेट चालू स्थितीत असताना ती चालू-बंद करण्याच्या बटणावर मिसफायर करत फट...फट... असा कर्णकर्कश बसवणारा आवाज मुद्दामहून काढला जातो. बुलेट चालू असताना बटन बंद करून पुन्हा चालू केल्यानंतरही मोठा आवाज येतो. फटाका फुटल्यासारखा किंवा कोणी फायरिंग केल्यासारखा हा आवाज असतो. पोलिसांच्या कारवाईमुळे या सर्व प्रकारांना पायबंद बसणार आहे.

कोट १
वाहनचालकांनी स्वतःहून गाड्यांमधील बेकायदेशीर सायलेन्सर ताबडतोब काढून टाकावेत. यापुढे असे सायलेन्सर आढळल्यास कोणतीही तडजोड न करता थेट दुचाकी जप्त केली जाईल.
- अभिजीत थोरात, परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Bajpayee: अभिनेता मनोज वाजपेयीने मुळशीत घेतली 4.45 एकर जमीन; किंमत ऐकून बसेल धक्का

Marathi Movie Issue : मराठी चित्रपटाची महाराष्ट्रातच गळचेपी! ‘समर्थ’ चित्रपटासाठी स्क्रीनची वानवा; अन्य भाषिक चित्रपटांना प्राधान्य

MRP पेक्षा 400 रुपयांनी महाग विकली ब्रा! महिलेची थेट कोर्टात धाव; न्यायाधीश म्हणाले, ‘माणसं खोटं बोलू शकतात, पण...

Pune News : २३ आराखड्यांनंतर आता पुन्हा वाहतुकीचा नवा आराखडा

शाळेत पाठवण्याऐवजी बारमध्ये नेलं, ग्राहकांसोबत अश्लील हावभाव करायला सांगितलं अन्...; अल्पवयीन मुलीसोबत आत्याचं अमानुष कृत्य

SCROLL FOR NEXT