कोकण

खेड - पाईप क्लीनरपासून आकर्षक फुले बनविण्याचे महिलांना प्रशिक्षण

CD

rat28p22.jpg-
60260
खेडः येथे प्रशिक्षणात फुले बनवताना महिला.

काही सुखद - लोगो

कौशल्याला मिळाली रोजगाराची जोड
खेड पालिकेचा पुढाकार; महिलांना मोफत प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २९ ः येथील नगर पालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्यावतीने शहरातील महिलांसाठी पाईप क्लीनरपासून आकर्षक फुले बनवण्याचे मोफत प्रशिक्षण नगर परिषदेच्या सभागृहात पार पडले. महिलांना स्वयंरोजगाराची संधी मिळावी आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने आयोजित या शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
खेडमधील या प्रशिक्षणाचे उद्घाटन नगराध्यक्षा माधवी बुटाला यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपनगराध्यक्ष सतीश चिकणे यांच्यासह नगरसेवक व पालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी प्रशिक्षक समीक्षा जाधव यांनी पाईप क्लीनरचा वापर करून विविध प्रकारची आकर्षक व सुंदर फुले कशी तयार करावीत, याचे प्रात्यक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच घरगुती वापरातील टाकाऊ वस्तूंपासून शोभेच्या टिकाऊ वस्तू कशा बनवाव्यात, याचेही धडे त्यांनी दिले. या प्रशिक्षणात खेड शहर परिसरातील सुमारे ४० महिलांनी हिरिरीने सहभाग घेतला. उपस्थित महिलांनी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवून घरगुती पातळीवर गृहउद्योग उभारण्याचा मानस व्यक्त केला. हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी पालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी नगरपालिकेने अशा प्रकारची रोजगाराभिमुख आणि कौशल्यविकास प्रशिक्षण शिबिरे सातत्याने आयोजित करावीत, अशी अपेक्षा सहभागी महिलांनी व्यक्त केली.

कोट
या प्रशिक्षणाचा उपयोग आगामी गणेशोत्सवामध्ये घरगुती मखर आणि गणेश सजावटीसाठी मोठ्या प्रमाणावर होईल. पाईप क्लीनरसारख्या साध्या वस्तूपासून इतक्या सुंदर आणि विविधांगी कलाकृती बनवता येतात, याचे उत्तम ज्ञान या शिबिरातून मिळाले.
- समिधा चिकणे, सहभागी महिला
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: माणुसकीही ओशाळली! नेपाळच्या पुरात वाहून आलेल्या तिजोरीतून ९२ लाखांची चोरी, २९ जणांना अटक

Sunil Tatkare Uddhav Thackeray : सुनिल तटकरेंनी उद्धव ठाकरेंना दिला तगडा झटका! रायगडमधील ठाकरेंचा प्रमुख शिलेदार राष्ट्रवादीत

Nepal Floods: नेपाळच्या महापुरात महाराष्ट्रातील ४०४ पर्यटक अडकले; ३३८ नागरिक सुरक्षित, ६० जण अद्याप बेपत्ता

Luck Zodiac Signs: फक्त ४ दिवस थांबा! शुक्राच्या गोचराने ‘या’ ७ राशींचं नशीब उघडणार; पैसा, प्रेम अन् करिअरमध्ये होणार मोठा फायदा

Maharashtra Monsoon Prediction : नागपूरच्या संविधान चौकात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT