कोकण

स्वर्णीला राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी प्रयत्न

CD

-rat२८p२१.jpg-
26O60252
चिपळूण ः स्वर्णीचा गौरव करताना विभागीय वनअधिकारी गिरिजा देसाई.
----
स्वर्णीच्या शौर्य पुरस्कारासाठी हलचाली
वनविभाग, पोलिसांचे सहकार्य ; शाळेतर्फे गौरव
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २९ : मगरीने आईवर अचानक हल्ला केल्यानंतर धाडसाने तिची सुटका करणाऱ्या दहा वर्षीय स्वर्णी भूपेंद्र पवार हिला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळावा, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यास शाळेला सर्वतोपरी सहकार्य करू, असे प्रतिपादन विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई यांनी केले.
भगवान परशुराम पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या आर. सी. काळे माध्यमिक विद्यालयातर्फे स्वर्णीच्या धाडसाचा गौरव करण्यासाठी रामकृष्ण स्मृती सभागृहात विशेष सत्कार सोहळा झाला. यावेळी देसाई आणि उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले यांच्या हस्ते स्वर्णीचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. अभय सहस्रबुद्धे अध्यक्षस्थानी होते. देसाई यांनी स्वर्णीच्या धाडसाबरोबरच तिच्यावर झालेल्या संस्कारांचे कौतुक केले. स्वर्णी राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी निश्चितपणे पात्र असून, त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
बेले यांनीही स्वर्णीच्या धाडसाचे कौतुक केले. मगरीसारख्या धोकादायक प्राण्याला न घाबरता आईचे प्राण वाचविण्याचा निर्णय तिने घेतला, ही बाब प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. शाळेने पुरस्कारासाठी योग्य प्रस्ताव सादर करावा. त्यासाठी पोलिस विभागाकडून आवश्यक सहकार्य केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी गांधी रिसर्च फाउंडेशनच्या ‘गांधी तीर्थ स्वच्छ शाळा’ राज्यस्तरीय स्पर्धेतील पुरस्काराबद्दल समन्वयक विशाखा माळी, निबंध व वक्तृत्व स्पर्धेतील यशाबद्दल आर्या जोशी व दर्शन पाटील, तसेच विज्ञान नाट्य स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक विनायक माळी यांनी शाळेच्या उपक्रमांची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: माणुसकीही ओशाळली! नेपाळच्या पुरात वाहून आलेल्या तिजोरीतून ९२ लाखांची चोरी, २९ जणांना अटक

Sunil Tatkare Uddhav Thackeray : सुनिल तटकरेंनी उद्धव ठाकरेंना दिला तगडा झटका! रायगडमधील ठाकरेंचा प्रमुख शिलेदार राष्ट्रवादीत

Nepal Floods: नेपाळच्या महापुरात महाराष्ट्रातील ४०४ पर्यटक अडकले; ३३८ नागरिक सुरक्षित, ६० जण अद्याप बेपत्ता

Luck Zodiac Signs: फक्त ४ दिवस थांबा! शुक्राच्या गोचराने ‘या’ ७ राशींचं नशीब उघडणार; पैसा, प्रेम अन् करिअरमध्ये होणार मोठा फायदा

Maharashtra Monsoon Prediction : नागपूरच्या संविधान चौकात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT