अवैध वाहतुकीवर कारवाई करा
सोल्येतील रिक्षाचालकांची मागणी ; ‘आरटीओ’स निवेदन
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २९ ः कोकण रेल्वेमार्गावरील तालुक्यातील सोल्ये येथील रेल्वेस्टेशनच्या येथून काही वाहनांमधून राजरोसपणे अवैधरीत्या प्रवासी वाहतूक केली जात आहे. त्याचा येथील अधिकृत रिक्षास्टॅन्डवरून होत असलेल्या वाहतूक व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होत आहे. त्यामुळे या अवैध वाहतुकीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रिक्षाचालक-मालक संघटनेचे ज्येष्ठ सदस्य अंकुश गुरव यांनी रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
सोल्ये येथील रेल्वेथांब्याच्या येथे अधिकृत रिक्षास्टॅन्ड असून, त्या ठिकाणाहून परवानाधारक रिक्षा व्यावसायिकांकडून प्रवाशांची ने-आण केली जाते; मात्र, गेल्या काही महिन्यांपासून राजरोसपणे काही चारचाकी वाहनांमधून अनधिकृतरीत्या प्रवाशांची ने-आण केली जात असल्याची लेखी तक्रार रिक्षा व्यावसायिक गुरव यांनी रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे केली आहे. अधिकृत रिक्षास्टँडवर संबंधित वाहने पार्क करण्यास मज्जाव करण्यात यावा तसेच नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधित वाहनचालक व मालकांवर कारवाई करावी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
--------------
कोट
अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या त्या चारचाकी वाहनाचे चालक आणि मालक त्या ठिकाणी परवानाधारक रिक्षा व्यावसायिकाशी अरेरावीची भाषा करतात.
-अनिल गुरव, रिक्षा व्यावसायिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.