rat२९p३.jpg-
26O60394
रत्नागिरी- ‘खेलेगा भारत, जितेगा भारत’ या संकल्पनेवर आधारित ‘रन अँड राइड’ रॅलीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी हिरवा झेंडा दाखला.
---
क्रीडादिनानिमित्त ‘रन अँड राइड’
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ : हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त रत्नागिरीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन प्रॅक्टिस रन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ‘खेलेगा भारत, जितेगा भारत’ या संकल्पनेवर आधारित ‘रन अँड राइड’ रॅली आज उत्साहात झाली.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी मारुती मंदिर येथून या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. ही रॅली मारुती मंदिर येथून निघून जेलनाकामार्गे जिल्हा क्रीडासंकुल येथे पोहोचली, जिथे रॅलीची सांगता झाली. रॅलीच्या प्रारंभी कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या मानसी मराठे यांनी सर्व सहभागी धावपटू व क्रीडाप्रेमींचा वॉर्मअप् करून घेतला. या उपक्रमात जिल्हा क्रीडाधिकारी विजय शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, कोकण कोस्टल मॅरेथॉनचे सचिन मराठे, केतकी लेले, स्नेहल कलाल, महेश खेडेकर, अभय सुर्वे, अनिरुद्ध कुलकर्णी यांच्यासह रा. भा. शिर्के प्रशालेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, विविध संघटनेचे खेळाडू असे सुमारे २०० हून अधिक धावपटू सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.