कोकण

कोरे विलीनीकरण राज्यांच्या अटींमध्ये अडकले

CD

कोकण रेल्वेला नव्या गुंतवणुकीची गरज
अभ्यासक विलास पाटणे यांचे मत ; दुपदरीकरण, सुरक्षा कामांची प्रतीक्षा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० ः कोकण रेल्वेला ३० वर्षांहून अधिक काळ झाला आहे. त्यामुळे मालमत्तेचे नूतनीकरण, पुनर्स्थापना, स्थानकांचे आधुनिकीकरण, भूस्खलन प्रतिबंधक उपाययोजना आणि सुरक्षिततेच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीची गरज आहे. कोकण रेल्वे ही स्वायत्त कंपनी असल्याने तिला भारतीय रेल्वेप्रमाणे थेट केंद्राकडून बजेटरी निधी मिळत नाही. विलीनीकरण झाल्यास थेट केंद्रीय रेल्वे बजेटमधून निधी मिळून प्रवाशांना आधुनिक सुविधा, उत्तम सिग्नल यंत्रणा आणि जलद प्रवासाचा फायदा होऊ शकतो, असे मत अभ्यासक विलास पाटणे यांनी सांगितले.
कोकण रेल्वेच्या विलीनीकरणासह विविध मुद्द्यांवर ते म्हणाले, जोपर्यंत कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड पूर्णपणे केंद्र सरकारच्या मालकीची होत नाही, तोपर्यंत तिचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण केले जाऊ शकत नाही, असे रेल्वे मंत्रालयाने लोकसभेत स्पष्ट केले आहे. यामध्ये सहभागी चार राज्यांचे भागभांडवल आणि त्यांच्या वेगवेगळ्या अटी हाच मुख्य अडथळा ठरत आहेत. लोकसभेतील उत्तरात स्पष्ट केल्यानुसार, सर्व सहभागी राज्यांनी आपला हिस्सा केंद्र सरकारकडे पूर्णपणे हस्तांतरित केल्यानंतरच विलीनीकरणाची पुढील प्रक्रिया शक्य आहे. मात्र, राज्यांच्या भूमिका भिन्न आहेत. विलीनीकरणाला तत्वतः मान्यता दिली आहे; मात्र सुरुवातीला केलेली ३९४ कोटी रुपयांहून अधिकची भांडवली गुंतवणूक भारतीय रेल्वेने परत करावी, अशी अट ठेवली आहे. तसेच, विलीनीकरणानंतरही कोकण रेल्वे हे मूळ नाव आणि तिची प्रादेशिक ओळख कायम ठेवावी, अशी महत्त्वपूर्ण अट महाराष्ट्राने घातली आहे.
कर्नाटकने या भागभांडवलातून बाहेर पडण्यासाठी ‘एक्झिट मेकॅनिझम’ची मागणी केली आहे. गोवा राज्य आपला हिस्सा केंद्राकडे हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली असून समभागांची अट ठेवली आहे. निधीच्या तुटवड्यामुळे कोकण रेल्वेचे अनेक महत्त्वाचे प्रकल्प रखडले आहेत. ७३९ किलोमीटरच्या संपूर्ण मार्गापैकी आतापर्यंत केवळ ५५ किलोमीटरचेच दुपदरीकरण झाले असून, पुढील २६३ किलोमीटरचे दुपदरीकरण अजूनही दृष्टिक्षेपातच आहे. याशिवाय वैभववाडी-कोल्हापूर, दिघी-माणगाव आणि जयगड-डिंगणी हे नवे जोडमार्ग आणि स्थानकांच्या आधुनिकीकरणाचे काम निधीच्या प्रतीक्षेत आहे.

चौकट
60593
कोकण रेल्वेतील भागभांडवलाची सद्यःस्थिती -
* केंद्र - ६६.७९ टक्के
* महाराष्ट्र - १४.९१ टक्के
* कर्नाटक - १०.१७ टक्के
* गोवा - ४.०७ टक्के
* केरळ - ४.०७ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परीक्षा केंद्रावर वीज गेल्याने NEET PG Exam रद्द, फेरपरीक्षा कधी? तारीख आली समोर

खिशात फक्त 20 पैसे, तीन दिवस उपाशी… जावेद अख्तरांनी सांगितला मुंबईतील संघर्षाचा काळ, म्हणाले...

Vaibhav Sooryavanshi: दुलीप ट्रॉफीत अचानक बदललं चित्र! इशान किशनला नेमकं काय झालं? १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीकडे आली कर्णधारपदाची धुरा

Nepal Flood : नेपाळच्या महापुरादरम्यान थरारक घटना ! एका साडीने वाचवला २१ जणांचा जीव; चेन्नईतील भाविकांनी सांगितली आपबीती

Vastu Tips: जुन्या कपड्यांनी फरशी पुसणे योग्य की अयोग्य? 'या' चुकीमुळे वाढू शकते आर्थिक टंचाई! वास्तूनुसार जाणून घ्या नियम...

SCROLL FOR NEXT