rat30p5.jpg-
60554
राजापूर ः विजेत्या संघाला उपसभापती चषक प्रदान करताना उपसभापती अभिजीत गुरव आणि मान्यवर.
उपसभापती चषकावर मारुती प्रसन्न संघाची मोहोर
पावसाळी क्रिकेट स्पर्धा ; शिव स्पोर्ट धोपेश्वर उपविजेते
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३० ः ‘उपसभापती चषक २०२६’ क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये शिव स्पोर्ट धोपेश्वर संघाचा पराभव करीत श्री मारुती प्रसन्न हर्डी संघाने उपसभापती चषकावर नाव कोरले. पावसाळी क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने श्री मारुती प्रसन्न क्रीडा मंडळ, हर्डी यांच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन केले होते.
राजापूर पंचायत समितीचे उपसभापती अभिजीत गुरव यांच्या हस्ते विजेते आणि उपविजेते संघांना आकर्षक चषक आणि रोख रक्कमेचे पारितोषिक देवून गौरविण्यात आले. यावेळी भाजपचे ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष संदिप तेरवणकर, हर्डीचे गावप्रमुख गजानन जड्यार, सुर्यकांत जड्यार, ज्येष्ठ ग्रामस्थ प्रभाकर जोगले, शांताराम जोगले यांच्यासह श्री मारुती प्रसन्न क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रसाद जड्यार, उपाध्यक्ष सुमित चोरगे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपांत्य फेरीच्या झालेल्या सामन्यांमध्ये आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करीत शिव स्पोर्ट धोपेश्वर आणि श्री मारुती प्रसन्न हर्डी यांनी अंतिम पेरीमध्ये धडक दिली. त्यानंतर या दोन्ही संघामध्ये विजेतेपदासाठी सामना रंगला. त्यामध्ये चुरशीच्या झालेल्या सामन्यामध्ये श्री मारुती प्रसन्न हर्डी संघाने शिव स्पोर्ट धोपेश्वर संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेमध्ये लक्षवेधी वैयक्तिक कामगिरी करणारा प्रथमेश सूद याला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून तर, प्रसाद जड्यार याला ना उत्कृष्ट फलंदाज म्हणून गौरविण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.