कोकण

बालकांच्या हक्कांचे संरक्षण संवेदनशीलतेने करा

CD

rat30p7.jpg-
60557
रत्नागिरी ः कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष विनोद जाधव.

बालकांच्या हक्कांचे संरक्षण संवेदनशीलतेने करा
जिल्हा न्यायाधीश विनोद जाधवः रत्नागिरीत कार्यशाळा
रत्नागिरी, ता. ३० ः बालकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना वेळेत न्याय मिळवून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने व संवेदनशीलतेने कार्य करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष विनोद जाधव यांनी केले.
रत्नागिरी झालेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ अंतर्गत बालकांशी संबंधित प्रकरणांमध्ये काम करणाऱ्या विविध शासकीय यंत्रणांमध्ये अधिक संवेदनशीलता, समन्वय आणि सुसूत्रता निर्माण व्हावी, या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे ''विधी सेवा सदन'' येथे मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले होते.
याप्रसंगी बाल न्याय मंडळाच्या प्रधान न्यायदंडाधिकारी तथा सहदिवाणी न्यायाधीश (क स्तर) ए. डी. गाडे यांनी बालकांशी संबंधित प्रकरणांमधील न्यायालयीन प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच, पोलीस उपअधीक्षक मुख्तार शेख यांनी बालकांचे संरक्षण आणि त्यासंबंधीच्या कायदेशीर तरतुदींवर प्रकाश टाकला, तर बालकल्याण समितीच्या सदस्य प्रिया लोवलेकर यांनी बाल हक्क आणि संरक्षणाशी संबंधित विविध विषयांवर उपस्थितांशी संवाद साधला.
प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील यांनी केले. या प्रसंगी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मनोज पाटणकर, बालकल्याण समितीच्या सदस्य विनया एस. घाग, शासकीय लोहमार्ग पोलीस अधिकारी संगीता लोंढे, बालकल्याण पोलीस अधिकारी, विशेष पोलीस पथकातील अधिकारी-कर्मचारी आणि प्राधिकरणाच्या पॅनलवरील वकील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेत शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांवर नवे निर्बंध! CPT इंटर्नशिप का आली अडचणीत? भारतीय विद्यार्थ्यांवरही परिणाम होणार?

Sunil Sharma Death : राजकारणात खळबळ! भाजपच्या दिग्गज नेत्याने जीवन संपवलं; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi याला १९ वर्षांखालील भारतीय संघातून का केलं बाहेर? BCCI चा नियम काय सांगतो?

Skin Care: ड्रेसिंग टेबलवर वर्षांनुवर्षे पडलेला परफ्युम सुरक्षित आहे का? त्वचेसाठी ठरू शकतो घातक; 'हे' बदल दिसताच वापरणे करा बंद! 

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवापूर्वी पुणे पोलिसांचा मोठा आदेश; १४ दिवस कलम ३७ लागू, पाचपेक्षा अधिक जणांच्या जमावावर बंदी

SCROLL FOR NEXT