कोकण

कसब्यात बाप्पांना खऱ्याखुऱ्या वस्त्रांचा राजेशाही साज

CD

rat30p1.jpg-
60547
कसबाः येथील अविराज कानसरे यांनी गणरायाला खऱ्याखुऱ्या वस्त्रांचा राजेशाही साज दिला आहे.

कसब्यात गणरायांना खऱ्याखुऱ्या वस्त्रांचा राजेशाही साज
मूर्तिकार अविराज कानसरे यांचा प्रयोग; मूर्तिशाळांमध्ये अंतिम टप्प्यातील तयारीस वेग
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ३० ः गणरायाच्या मूर्तीला आकार देणे ही कला; पण त्या मूर्तीमध्ये भक्तांना भावणारा जिवंतपणा निर्माण करणे ही कलाकाराची खरी कसोटी असते. कसबा येथील युवा मूर्तिकार अविराज कानसरे यांनी त्यांच्या चित्रशाळेत यंदा गणेशमूर्तींना चक्क खऱ्याखुऱ्या वस्त्रांचा साज चढवण्यात आला असून, गणरायाचे हे राजेशाही रूप भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.
गणेशोत्सवाचे वेध लागले असून मूर्तिशाळांमध्ये अंतिम टप्प्यातील तयारीला सुरूवात झाली आहे. तयार झालेल्या मूर्ती रंगवण्यात येत आहेत. त्यामुळे मूर्तिकारांना उसंत घेण्यास वेळ नाही. कसबा येथील मूर्तिकार कानसरे यांनी वेगळा प्रयोग केला आहे. मातीच्या गोळ्याला आकार देताना केवळ मूर्ती घडवण्यावर भर न देता, गणरायांच्या व्यक्तिमत्त्वाला अनुरूप वस्त्रसाजाची संकल्पना अविराज यांनी प्रत्यक्षात आणली आहे. वस्त्रांची निवड, त्यांची सुरेख घडी, रंगांची सांगड आणि मूर्तीच्या बारकाव्यांचा उठाव यामुळे या मूर्तींमध्ये वेगळीच राजेशाही झळाळी दिसून येते. त्यामुळे चित्रशाळेत साकारलेले गणराया पाहताना साक्षात गणरायच विराजमान झाले आहेत, असा भास होतो. आजच्या काळात गणेशमूर्ती सजावटीत अनेक प्रयोग होत असले, तरी मूर्तीच्या अंगावर प्रत्यक्ष वस्त्रांचा साज चढवून तिच्या रूपात भव्यता आणण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहे.

चौकट
कलेतून उमटलेली भक्ती
अविराज कानसरे यांच्या या अनोख्या प्रयोगाचे गणेशभक्त स्वप्निल पाटेकर यांनी भरभरून कौतुक केले. "मूर्ती घडवणे अनेकांना जमते; पण गणरायाच्या रूपात नवा विचार मांडणे प्रत्येकाला जमत नाही. अविराज यांच्या चित्रशाळेतील खऱ्याखुऱ्या वस्त्रांच्या साजातील गणराय म्हणजे कलेतून उमटलेली भक्ती, कल्पकतेतून साकारलेली भव्यता आणि परंपरेला आधुनिकतेची मिळालेली नवी किनार आहे," अशा शब्दांत पाटेकर यांनी त्यांच्या कलेचा गौरव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवापूर्वी पुणे पोलिसांचा मोठा आदेश; १४ दिवस कलम ३७ लागू, पाचपेक्षा अधिक जणांच्या जमावावर बंदी

खिशात फक्त 20 पैसे, तीन दिवस उपाशी… जावेद अख्तरांनी सांगितला मुंबईतील संघर्षाचा काळ, म्हणाले...

Vaibhav Sooryavanshi: दुलीप ट्रॉफीत अचानक बदललं चित्र! इशान किशनला नेमकं काय झालं? १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीकडे आली कर्णधारपदाची धुरा

Nepal Flood : नेपाळच्या महापुरादरम्यान थरारक घटना ! एका साडीने वाचवला २१ जणांचा जीव; चेन्नईतील भाविकांनी सांगितली आपबीती

Vastu Tips: जुन्या कपड्यांनी फरशी पुसणे योग्य की अयोग्य? 'या' चुकीमुळे वाढू शकते आर्थिक टंचाई! वास्तूनुसार जाणून घ्या नियम...

SCROLL FOR NEXT