कोकण

गणपतीपुळेचा पर्यंटन विकास ''कासवगतीनेच''

CD

ग्राऊंड रिपोर्ट----लोगो

फोटो ओळी
rat३०p९.jpg-
६०५८७
गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षेच्या उपाययोजनांची प्रतिक्षाच.
rat३०p१०.jpg-
६०५८५
गणपतीपुळे प्रसिद्ध मंदिर
rat३०p११.jpg-
६०५८६
श्री गणरायाची मूर्ती
rat३०p१७.jpg, rat३०p१८.jpg, rat३०p१९.jpg-
६०६०५
६०६०६
एका बाजूला डोंगर आणि समोर अथांग समुद्रकिनाऱ्यावर वसलेले प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिर आणि परिसर.
--------

इंट्रो

जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळेचा सर्वांगीण विकास करून नवी ओळख मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने १०२ कोटी २८ लाख ६१ हजाचा पर्यटन विकास आराखडा मंजूर केला. २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात या कामांचा नारळही फुटला. मात्र, ७ वर्षांचा कालावधी उलटूनही निधी अभावी या विकास आराखड्यातील अत्यंत महत्त्वाची कामे रखडली आहेत. बैठकांचा धडाका आणि घोषणांचा पाऊस सुरू असला तरी प्रत्यक्ष जमिनीवरील विकासाचा वेग मात्र कासवगतीनेच असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. रस्त्यांच्या कामाला वाढत्या हरकतीमुळे आणि कोटींच्या निधीची कमतरतेमुळे या कामाला खिळ बसली. त्यात प्रशासकीय आणि राजकीय उदासिनताही दिसून आल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली.

- राजेश शेळके, रत्नागिरी
--

गणपतीपुळेचा पर्यंटन विकास कासएकवगतीने!

बैठकांचा धडाका अन् घोषणांचा पाऊस ; महत्त्वाकांक्षी विकास आराखडा लालफितीत

एक नजर
* निधीची कमतरता
* ग्रामस्थांच्या हरकतीने प्रशासन बेजार
* विकास कामे करताना अडथळा

निधीची कमतरता आणि स्थानिक पातळीवरील अडचणी सोडवण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी नुकताच आढावा घेतला. तसेच रखडलेला निधी आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह अर्थमंत्र्यांकडे पाठपुरावा करून मे २०२७ पर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. तत्पुर्वी पालकमंत्री यांनीच गणपतीपुळे आराखडा पूर्ततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांची ''सनियंत्रण अधिकारी'' म्हणून नियुक्ती केली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी समितीने तीन टप्प्यांत ३१ मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक होते. कोरोना महामारीचा कालावधी वगळता त्यानंतरही काही वर्षांचा काळ उलटून गेला, तरीही आराखडा अपूर्णच आहे. रखडलेल्या कामांना प्रत्यक्ष गती देण्याऐवजी केवळ आढावा बैठकांवरच अधिक भर दिला जात आहे. दोन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांनी गणपतीपुळे येथे विशेष बैठक घेऊन कामांना तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले होते. तसेच पुढील २० वर्षांसाठी नवीन ''मास्टर प्लॅन'' तयार करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, आधीच रखडलेला विकास आराखडा पूर्ण करायचा की नवीन कागदी मास्टर प्लॅनवर भर द्यायचा?" असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे पालकमंत्री यांनी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर तरी विकास आराखड्याला चालना मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
---------------------

आराखड्यातील महत्वाची कामे अधांतरी

दर्शन रांग, विद्युत व्यवस्था आणि सुलभ दुरुस्तीची मोजकीच कामे पूर्ण झाली आहेत. पाणीपुरवठा योजना: पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ''जीएसआर'' आणि ''ईएसआर'' या दोन टाक्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून, गावातील अंतर्गत पाइपलाइनचे काम ८० ते ९० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, चाफे ते गणपतीपुळे मुख्य जलवाहिनीचे काम अद्याप अपूर्णच आहे. सांडपाणी व कचरा व्यवस्थापन: सांडपाणी व्यवस्थापनाचे काम पूर्णतः अपूर्ण आहे. घनकचरा व्यवस्थापनालाही अपेक्षित गती मिळालेली नाही; केवळ दोन घंटागाड्या देऊन प्रशासनाने बोळवण केली. रस्ते विकास व गटारे: आपटा ते शासकीय विश्रामगृह रस्ता आणि मोरया चौक ते बँक ऑफ इंडिया (रानडे रोड) या रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले आहे. मात्र, या रस्त्यांना आवश्यक असणाऱ्या बाजूच्या गटारांचे काम अद्याप झालेले नाही, ज्यामुळे आगामी पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचून मोठ्या समस्या निर्माण होण्याची भीती आहे. मुख्य स्वागत कमानीचे कामही अर्धवट अवस्थेत लटकलेले आहे.
-----------------

''या'' घोषणा केवळ कागदावरच?

पर्यटन विकास आराखड्यात मंदिर परिसरातील आपटा तिठा ते मोरया दरम्यानच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण, संपूर्ण गावासाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणे (एसटीपी), भूमिगत गटार योजना, गणपतीपुळे, देऊड व चाफे गावांसाठी एकत्रित पाणीपुरवठा योजना, वाहनतळ विकास आणि जागा अधिग्रहण यांसारख्या मोठ्या कामांचा समावेश होता. मात्र पाणी योजनेवरून या आराखड्याला ग्रहण लागले ते अजून काही सुटलेले नाही. देऊड आणि चाफे येथून ही पाणी योजना जाणार आहे. त्या गावांनीही आम्हाला पाणी मिळावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे या कामाची गती मंदावली आहे. याशिवाय भाविकांसाठी आधुनिक दर्शन रांग व शेड, मंदिरासमोरील बंधाऱ्याची दुरुस्ती व सुशोभीकरण, आकर्षक एलईडी हायमास्ट, दुकान गाळे, पेव्हिंग ब्लॉक, सार्वजनिक शौचालय, चेंजिंग रूम्सचे नूतनीकरण, सौरऊर्जा प्रकल्प, समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी बोयेज बसवणे आणि मुषकाची प्रतिकृती उभारणे यांसारख्या वाढीव तरतुदीतील कामांचाही समावेश आहे. यातील बहुतांश कामे अजूनही कागदावरच अडकलेली आहेत.
गणपतीपुळे येथे दरवर्षी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक आणि पर्यटक दाखल होतात. पर्यटकांच्या वाढत्या गर्दीच्या तुलनेत पाणी, स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, पार्किंग, सुरक्षितता आणि रस्ते या मूलभूत सुविधांवर प्रचंड ताण येत आहे.
--------------

१९ कोटी ५५ लाख निधी खर्च

श्री क्षेत्र गणपतीपुळे तीर्थक्षेत्र, देऊड व चाफे नळ पाणी पुरवठा योजना, भुयार गटार प्रक्रिया व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापन अशा एकूण ३ महत्त्वाच्या कामांसाठी तब्बल ३९ कोटी ३९ लाख लक्ष रुपयांची तरतूद पर्यटन विकास आराखड्याअंतर्गत २६ फेब्रुवारी २०१९ च्या शासन निर्णयानुसार करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात या विभागास केवळ १९ कोटी ५६ लाख रुपयांचाच निधी प्राप्त झाला. त्यापैकी १९ कोटी ५५ लाख रुपयांचा खर्च आधीच झाला आहे.
------------------

२७ कोटी ८४ लाख निधीची गरज

गणपतीपुळे, देऊड व चाफे पाणीपुरवठा योजनेअंतर्गत गुरुत्ववाहिनी आणि वितरण पाईपलाईनचे काही काम झाले असले, तरी चाफे ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्या गावातील कामांना अजूनही सुरुवातच होऊ शकलेली नाही. तसेच देऊड-चाफे हद्दीतील बंधारा आणि विहिरींचे काम केवळ पन्नास टक्केच झाले असून उर्वरित कामे निधीच्या प्रतीक्षेत आहेत. गणपतीपुळे येथील भुयार गटार प्रक्रिया व्यवस्थापनाचे काम स्थानिक ग्रामस्थांचा विरोध आणि मार्ग बदलावा लागल्याच्या कारणास्तव अत्यंत संथ गतीने सुरू असून केवळ ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे. घनकचरा व्यवस्थापनाची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही, जागा उशिरा मिळाल्यामुळे आणि निधीच्या कमतरतेमुळे या प्रकल्पाचे काम केवळ ३० टक्केच झाले आहे. शासनाने तातडीने लक्ष घालून उर्वरित २७ कोटी ८४ लाख रुपयांचा निधी द्यावा जेणेकरून रखडलेली तीर्थक्षेत्राची विकासकामे मार्गी लागतील.
---------------

रस्ते रुंदीकरणाबाबत हरकती

या विकास आराखड्यानुसार गणपतीपुळेतील सर्व रस्ते कॉंक्रिटचे होणार आहेत. एकदा कॉंक्रिटीकरण झाले खोदाई करता येणार नाही, म्हणून ग्रामपंचायतीने पाईपलाईन टाकण्यासाठी हे काम तात्पुरते थांबविण्यास सांगिलले होते. त्यात रस्ते रुंदीकरणासाठी जागा लागणार आहे. या जागेसेठी अनेकांनी हरकती घेतल्या आहेत. या हरकती वाढत गेल्यामुळे कामात अडथळा निर्माण झाला आहे.
-----------------

कोट १
गणपतीपुळे विकास आराखड्यातील कामे अंडरग्राऊंड पाईपलाईन पूर्ण होईपर्यंत रस्त्याचे काम थांबविण्यास ग्रामपंचायतीने सांगितले. भगवती नगर ते गणपतीपुळे रस्ता रुंदीकरणासाठी जागा आवश्यक आहे. त्याला अनेक जागा मालकांनी हरकती घेतल्या आहेत. हरकतींमुळे आराखड्याचे काम रखडले आहे.
- गजानन पाटील, उपजिल्हाप्रमुख शिवसेना
------------------

कोट २
गणपतीपुळे विकास आराखड्याबाबत नुकतीच आढावा बैठक घेतली. यामध्ये काही अडचणी आहेत. तसेच निधीची कमतरता देखील आहे. त्यासाठी शासनाला प्रस्ताव देऊन अपेक्षित निधी मंजूर करून घेतला जाईल.
- उदय सामंत, पालकमंत्री रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Parbhani : परभणीत एकनाथ शिंदेंच्या भाषणाला सुरुवात होताच ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा अन्... नेमकं काय घडलं?

अमेरिकेत शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांवर नवे निर्बंध! CPT इंटर्नशिप का आली अडचणीत? भारतीय विद्यार्थ्यांवरही परिणाम होणार?

Pimpalvandi Minor Murder Case: पिंपळवंडीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार-हत्येप्रकरणी २ सप्टेंबरपर्यंत चार्जशीट; फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवण्याचा मंत्र्यांचा निर्धार

Relationship Numerology: 'या' मूलांकांच्या नणंद-भावजयीची जोडी असते सुपरहीट; पाहा अंकशास्त्रातील ३ सर्वात बेस्ट कॉम्बिनेशन्स!

Sunil Sharma Death : राजकारणात खळबळ! भाजपच्या दिग्गज नेत्याने जीवन संपवलं; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT