जायंट्स ग्रुपतर्फे उंडण वृक्षारोपण
रत्नागिरी : जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरीतर्फे भाटीमिऱ्या, सडामिऱ्या म्हसोबा देऊळ रस्ता येथे वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. या वेळी भाटीमिऱ्या, दत्तमंदिर मुख्य रस्त्यापासून म्हसोबा मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यावर तीस उंडण जातीच्या रोपांची लागवड करण्यात आली. खाऱ्या पाण्याचे वातावरण उंडण जातीच्या झाडांसाठी पोषक असते. त्यामुळे वृक्षारोपणासाठी या जातीच्या झाडांची निवड करण्यात आली. या वेळी जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष महेश दामले, विशेष समिती सदस्य मिलिंद सावंत, सदस्य विजय पोकळे, संजय पुराणिक, भरत इदाते आणि दैविक तारे, संकेत ढेरे, श्रेयस गावकर उपस्थित होते.
----------------
संस्कृती स्पंदन भित्तिपत्रकाचे अनावरण
रत्नागिरी : देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात संस्कृतीस्पंदन या भित्तिपत्रकाचे अनावरण भारत शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष सौ. नमिता कीर यांच्या हस्ते झाले. भारतीय संस्कृती-समृद्ध वारसा, उज्ज्वल भविष्य या संकल्पनेवर आधारित हे भित्तिपत्रक विद्यार्थ्यांनी साकारले आहे. यामध्ये भारतीय संस्कृती, कला, परंपरा, साहित्य आणि ऐतिहासिक वारशाचे विविध पैलू मांडण्यात आले आहेत. अनावरण प्रसंगी भारत शिक्षण मंडळाचे कार्यवाह धनेश रायकर व पदाधिकारी, तसेच प्र. प्राचार्या प्रा. मधुरा पाटील, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. भित्तिपत्रक विभागप्रमुख प्रा. प्रियंका कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम साकारण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. हर्षदा लिंगायत यांनी केले. प्रा. गौरी हळदवणेकर यांनी आभार मानले.
---------
गोगटे महाविद्यालयाचा प्रशिक्षणात सहभाग
रत्नागिरी : गोगटे- जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) येथील या पाच विद्यार्थ्यांनी कौशल्य प्रशिक्षणात भाग घेतला. यात गौरांग नामजोशी (तृतीय वर्ष कला, भूगोल), साक्षी बेर्डे, पियुष परब (तृतीय वर्ष विज्ञान, जैवरसायनशास्त्र), मुग्धा जाधव आणि चित्रा फणसेकर (तृतीय वर्ष विज्ञान, वनस्पतीशास्त्र) यांचा समावेश होता. ब्रिटिश कौन्सिल, एचएसबीसी आणि मुंबई विद्यापीठाच्यावतीने आयोजित हे प्रशिक्षण हवामान कौशल्यावर आधारित होते. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील नॅशनल सेंटर फॉर नॅनोसायन्स अँड नॅनोटेक्नॉलॉजी येथे कार्यक्रम झाला. या प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना हवामान बदल, शाश्वत विकास, नेतृत्वगुण आणि हरित उद्योजकता याविषयी सखोल ज्ञान व व्यावहारिक कौशल्ये तज्ज्ञांची व्याख्याने, संवादात्मक कार्यशाळा, गटचर्चा तसेच विविध कृतींमधून प्राप्त झाली. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर या विद्यार्थ्यांना ''रत्नागिरी जिल्हा क्लायमेट यंग लीडर्स'' म्हणून मान्यता देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.