कोकण

साखरपा परिसरात हळवी भातशेती पसवली

CD

उघडीप मिळताच भातशेती बहरली
हळव्या भाताला लोंबी; महिनाभरात कापणीची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. ३१ ः गेल्या आठवड्यापासून रत्नागिरी जिल्ह्यासह साखरपा परिसरात पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. ढगाळ वातावरण कमी होऊन लख्ख ऊन पडण्यास सुरुवात झाल्याने परिसरातील ‘हळवी’ (लवकर येणारी) भातशेती पोसवण्यास आणि रोपांना लोंबी धरण्यास सुरुवात झाली आहे.
साधारणपणे ९० ते ११० दिवसांच्या कालावधीत तयार होणाऱ्या हळव्या भाताच्या प्रजाती आता परिपक्वतेच्या अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. पावसानं दिलेली उघडीप आणि सध्याचे पोषक हवामान यामुळे भाताची रोपे टपोरी आणि दर्जेदार होण्यास मदत होत आहे. जर आगामी काळातही उन्हाची हीच तीव्रता कायम राहिली, तर येत्या महिन्याभरात ही पिके पूर्णपणे कापणीयोग्य होतील. त्यामुळे गणेशोत्सवाचा सण आटोपल्यानंतर लगेचच परिसरात भातकापणीच्या कामांना वेग येईल, असा अंदाज स्थानिक शेतकऱ्यांकडून वर्तवला जात आहे.
पावसाने घेतलेली विश्रांती आणि मिळणारे पुरेसे ऊन यामुळे भाताच्या लोंब्या चांगल्या प्रकारे भरण्यास मदत होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच ९० ते ११० दिवसांत तयार होणाऱ्या हळव्या बियाण्यांची शेते पोसवून पिवळसर छटा धारण करू लागली आहेत. हवामानाचा अंदाज पाहता गणेशोत्सवानंतर लगेचच हळव्या भाताच्या कापणीला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zomato Rules: झोमॅटोवर बनावट पनीरला नो एंट्री! Analog Dairy पदार्थांवर बंदी; रेस्टॉरंट्ससाठी कडक नियम जारी

गौतम गंभीरचा 'विश्वासू' चमकला; संघ संकटात असताना पठ्ठ्या उभा राहिला, श्रेयस अय्यरला वर्ल्ड कप २०२७ साठी टफ फाईट

Tea Price Hike: 'कटिंग' ला महागाईचा कट! साखर, दूध, गॅस, चहाच्या वाढत्या खर्चामुळे दरवाढीची शक्यता

Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! भरधाव ट्रॅव्हल्सची कंटेनरला धडक; एक ठार, १० प्रवासी गंभीर

ट्विंकल खन्नावर मुंढे इफेक्ट! तुकाराम मुंढेंनी हॉटेल चेक केलंय का…? आधी प्रश्न विचारला मग पनीर मागवलं, पुढे...

SCROLL FOR NEXT