कोकण

मृणाल हेगशेट्ये वक्तृत्व स्पर्धेत शिवम जाधवची बाजी

CD

-rat३०p३६.jpg-
26O60692
रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्था आयोजित वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांसह मान्यवर.
----
वक्तृत्वमध्ये शिवम जाधवचे यश

‘नवनिर्माण, एसकेएसव्ही’ने पटकावला सांघिक चषक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३१ : (कै.) मृणाल हेगशेट्ये स्मृती राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या राज्यस्तरीय वरिष्ठ महाविद्यालयीन गटात शिवम जाधव याने प्रथम क्रमांक पटकावत मानाचा किताब मिळवला. जिल्हास्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन गटात राधा समीर पाटणकर, माध्यमिक मराठी गटात संस्कृती शांताराम कोकरे, तर इंग्रजी माध्यम गटात ग्रीष्मा अजित नोंदोस्कर यांनी प्रथम क्रमांक पटकावून आपापल्या गटात अव्वल स्थान मिळवले. कनिष्ठ महाविद्यालयीन गटाचा सांघिक चषक नवनिर्माण महाविद्यालयाने, तर वरिष्ठ महाविद्यालयीन गटाचा सांघिक चषक एसकेएसव्ही कॉलेज (लांजा) यांनी पटकावला.
स्पर्धेत पुणे, मुंबई, रायगड, कोल्हापूर, सांगली, संभाजीनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांतील तब्बल १५६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत वक्तृत्वाचा जणू उत्सवच साजरा केला. जिल्हास्तरीय माध्यमिक गटातील मराठी व इंग्रजी माध्यम, जिल्हास्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन गट आणि राज्यस्तरीय वरिष्ठ महाविद्यालयीन गट अशा चार गटांत ही स्पर्धा घेण्यात आली.
स्पर्धेचे उद्‍घाटन माजी आमदार तथा राजापूरच्या नगराध्यक्षा हुस्नबानू खलिपे यांच्या हस्ते झाले. बक्षीस वितरण मंदार फणसे यांच्या हस्ते झाले. या वेळी नवनिर्माणचे अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, संचालक डॉ. अलिमियॉं परकार, संचालिका सीमा हेगशेट्ये, ऋतुजा हेगशेट्ये, प्राचार्य संजय गवाळे, आर्किटेक्ट संतोष तावडे, मिथलेश देसाई, स्पर्धा संयोजक सचिन टेकाळे, परीक्षक डॉ. केदार काळवणे, डॉ सदानंद आग्रे, संदीप कांबळे, ईश्वरचंद्र हलगरे, बाणे, चैतन्य कांबळे आदी उपस्थित होते.
-------
गटनिहाय स्पर्धेतील विजेते
जिल्हास्तरीय माध्यमिक मराठी गट- प्रथम- संस्कृती कोकरे (नवनिर्माण हाय), द्वितीय- तपस्या बोरकर (फाटक हायस्कूल), तृतीय- आर्या यादव (केंद्रीय नवोदय विद्यालय, पडवे). उत्तेजनार्थ- देवता पाटील (डी. जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूल), पंकजा गीते (मीनाताई ठाकरे हायस्कूल, साडवली).
इंग्रजी माध्यम माध्यमिक गट- ग्रीष्मा नोंदोस्कर (एसव्हीआयसीटी इंग्लिश मीडियम स्कूल, कासारवाडी), आफ्रा डिंगणकर (नवनिर्माण हाय), जान्हवी देवघरे (संतोष भाई मेहता स्कूल, दापोली), उत्तेजनार्थ- तीर्था नाखरेकर (नवनिर्माण हाय), रिद्धी चौगले (संतोष भाई मेहता स्कूल, दापोली).
जिल्हास्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन गट- राधा पाटणकर (अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय), विधी कापडी (नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालय), नीरज तलाठी (अण्णासाहेब बेहरे कॉलेज, लवेल-खेड). बिल्वा रानडे (वि. स. गांगण ज्युनिअर कॉलेज), श्रेया मेस्त्री (ज्ञानदीप कॉलेज, बोरज-खेड). या गटाचा सांघिक चषक नवनिर्माण महाविद्यालयाने पटकावला.
राज्यस्तरीय वरिष्ठ महाविद्यालयीन गट- शिवम जाधव (पुणे विद्यापीठ), अनिकेत वनारे (जेधे महाविद्यालय, पुणे), अभय आळशे (मुंबई विद्यापीठ). उत्तेजनार्थ- भगवंत कोळी (कला, वाणिज्य महाविद्यालय वारजे, माळवाडी, पुणे), अथर्व पाध्ये (एसकेएसव्ही कॉलेज, लांजा). या गटाचा सांघिक चषक एसकेएसव्ही कॉलेजने पटकावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zomato Rules: झोमॅटोवर बनावट पनीरला नो एंट्री! Analog Dairy पदार्थांवर बंदी; रेस्टॉरंट्ससाठी कडक नियम जारी

गौतम गंभीरचा 'विश्वासू' चमकला; संघ संकटात असताना पठ्ठ्या उभा राहिला, श्रेयस अय्यरला वर्ल्ड कप २०२७ साठी टफ फाईट

Tea Price Hike: 'कटिंग' ला महागाईचा कट! साखर, दूध, गॅस, चहाच्या वाढत्या खर्चामुळे दरवाढीची शक्यता

Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! भरधाव ट्रॅव्हल्सची कंटेनरला धडक; एक ठार, १० प्रवासी गंभीर

ट्विंकल खन्नावर मुंढे इफेक्ट! तुकाराम मुंढेंनी हॉटेल चेक केलंय का…? आधी प्रश्न विचारला मग पनीर मागवलं, पुढे...

SCROLL FOR NEXT