कोकण

लोखंड वितळवून चमचे बनवण्यासाठी

CD

सल्फर पावडरमागचे गूढ उकलले

चमचे बनविण्याच्या प्रयोगासाठी मागवल्याचे स्पष्ट

सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ३१ : तालुक्यातील एका १७ वर्षीय तरुणाने ऑनलाइन एक किलो सल्फर पावडर मागविल्याने निर्माण झालेल्या संशयाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या चौकशीला अखेर पूर्णविराम मिळाला. संबंधित तरुणाने युट्युबवरील व्हिडीओ पाहून लोखंड वितळविण्याची प्रक्रिया समजून घेत त्यापासून चमचे तयार करण्याचा प्रयोग करण्याच्या उद्देशाने सल्फर पावडर मागविल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. प्रयोग केल्यानंतर उर्वरित रसायन त्याने मातीत टाकून दिल्याचेही समोर आले आहे.
१७ वर्षीय मुलाने एक किलो सल्फर पावडर मागविल्याची माहिती समोर आल्यानंतर या प्रकरणाकडे पोलिसांसह विविध यंत्रणांचे लक्ष वेधले गेले होते. मोठ्या प्रमाणात सल्फर पावडर मागविण्यामागे नेमका काय उद्देश होता, याबाबत विविध शक्यता व्यक्त केल्या जात होत्या. त्यामुळे पोलिस यंत्रणेने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत चौकशी सुरू केली होती. चौकशीदरम्यान संबंधित तरुणाकडून सल्फर पावडर मागविण्यामागील कारणाची माहिती घेण्यात आली. युट्युबवरील व्हिडीओ पाहिल्यानंतर लोखंड वितळविण्याची प्रक्रिया पाहून त्यापासून चमचे बनविण्याचा प्रयोग करून पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली. त्यातूनच त्याने सल्फर पावडर मागविल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती मिळाली आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zomato Rules: झोमॅटोवर बनावट पनीरला नो एंट्री! Analog Dairy पदार्थांवर बंदी; रेस्टॉरंट्ससाठी कडक नियम जारी

गौतम गंभीरचा 'विश्वासू' चमकला; संघ संकटात असताना पठ्ठ्या उभा राहिला, श्रेयस अय्यरला वर्ल्ड कप २०२७ साठी टफ फाईट

Tea Price Hike: 'कटिंग' ला महागाईचा कट! साखर, दूध, गॅस, चहाच्या वाढत्या खर्चामुळे दरवाढीची शक्यता

Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! भरधाव ट्रॅव्हल्सची कंटेनरला धडक; एक ठार, १० प्रवासी गंभीर

ट्विंकल खन्नावर मुंढे इफेक्ट! तुकाराम मुंढेंनी हॉटेल चेक केलंय का…? आधी प्रश्न विचारला मग पनीर मागवलं, पुढे...

SCROLL FOR NEXT