कोकण

संगमेश्वरमध्ये ठाकरे सेना मजबूत करणार

CD

- rat३१p४.jpg-
26O60798
चिपळूण : येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
---
‘मातोश्री’वर संघटन बळकटीचे मंथन

चिपळूण-संगमेश्वरातील शिवसैनिकांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३१ : चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील पक्षाची मध्यवर्ती भूमिका, संघटनात्मक कामकाज बळकट करणे आणि आगामी काळातील राजकीय वाटचाल या संदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शिवसैनिकांनी सविस्तर चर्चा झाली. पक्षसंघटन अधिक मजबूत करा या दृष्टीने हा संवाद महत्त्वाचा ठरल्याचे रत्नागिरी जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे यांनी सांगितले.
चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नुकतीच मुंबई येथील ‘मातोश्री’ निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी पक्षप्रमुखांचे मोलाचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळाल्याने मतदार संघात पक्षाच्या संघटनात्मक कामाला नवी ऊर्जा मिळाल्याची उत्स्फूर्त भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. या भेटीबाबत अधिक माहिती देताना पक्षाचे चोरगे म्हणाले, शिवसैनिकांसाठी ‘मातोश्री’ हे केवळ निवासस्थान नसून एक पवित्र श्रद्धास्थान आहे. अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांचे तेथे जाऊन पक्षप्रमुखांना भेटण्याचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर प्रत्यक्ष संवाद साधून त्यांचे मार्गदर्शन मिळणे, हा प्रत्येक कार्यकर्त्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आणि संस्मरणीय क्षण ठरला.
या मुंबई दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांचीही भेट घेऊन संवाद साधला. पक्षाची मध्यवर्ती भूमिका, संघटनात्मक कामकाज बळकट करणे आणि आगामी काळातील राजकीय वाटचाल या संदर्भात या भेटीत सविस्तर चर्चा झाली. पक्षसंघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हा संवाद अत्यंत महत्त्वाचा ठरल्याचे चोरगे यांनी स्पष्ट केले. या महत्त्वपूर्ण सदिच्छा भेटीसाठी पुढाकार घेत सहकार्य केल्याबद्दल कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते व सचिव, माजी खासदार विनायक राऊत, रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख सुरेश कदम, जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम आणि उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस यांचे आभार मानले.
---
जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्याचा निर्धार
‘मातोश्री’वर मिळालेले प्रबोधनात्मक मार्गदर्शन, ज्येष्ठ नेत्यांचे पाठबळ आणि सहकाऱ्यांचा विश्वास सोबत घेऊन चिपळूण-संगमेश्वर मतदार संघात सर्वसामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी आणि प्रश्नांसाठी अधिक आक्रमकपणे व जोमाने काम करण्याचा दृढ निर्धार सर्व पदाधिकाऱ्यांनी या वेळी व्यक्त केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट चिपळूण-संगमेश्वर मतदार संघातील पक्षाच्या बांधणीसाठी अत्यंत मैलाचा दगड मानली जात आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zomato Rules: झोमॅटोवर बनावट पनीरला नो एंट्री! Analog Dairy पदार्थांवर बंदी; रेस्टॉरंट्ससाठी कडक नियम जारी

गौतम गंभीरचा 'विश्वासू' चमकला; संघ संकटात असताना पठ्ठ्या उभा राहिला, श्रेयस अय्यरला वर्ल्ड कप २०२७ साठी टफ फाईट

Tea Price Hike: 'कटिंग' ला महागाईचा कट! साखर, दूध, गॅस, चहाच्या वाढत्या खर्चामुळे दरवाढीची शक्यता

Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! भरधाव ट्रॅव्हल्सची कंटेनरला धडक; एक ठार, १० प्रवासी गंभीर

ट्विंकल खन्नावर मुंढे इफेक्ट! तुकाराम मुंढेंनी हॉटेल चेक केलंय का…? आधी प्रश्न विचारला मग पनीर मागवलं, पुढे...

SCROLL FOR NEXT