कोकण

राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

CD

-rat३१p३.jpg-
26O60797
रत्नागिरी ः युवा मार्शल आर्ट केंद्रातर्फे तायक्वांदोचे प्रशिक्षण देण्यात आले.
----
तायक्वांदो खेळाडूंचा क्रीडादिनी गौरव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३१ ः ‘युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर’ आणि ‘मेरा युवा भारत, रत्नागिरी’ (भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.
गोडाऊन स्टॉप येथील साई सेवा मित्रमंडळात आयोजित या कार्यक्रमास ओम साई मित्रमंडळाचे अध्यक्ष संतोष सावंत, सोनाली सावंत, मधुर धुळप व पांडुरंग आंबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान खेळाडू नुपूर दप्तरदार व सई सुवरे यांनी राष्ट्रीय क्रीडादिनाचे महत्त्व पटवून दिले. या प्रसंगी तेलंगणा (हैदराबाद) येथे झालेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या मयूरी कदम व रूही कररा, गुरुप्रसाद सावंत व उपर्जना राम कररा यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय, ब्लॅक बेल्ट फर्स्ट डॅन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या खेळाडूंना दक्षिण कोरियातून प्राप्त झालेली अधिकृत प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यात मंथन आंबेकर, युसुफ मोगल, सिद्धी धुळप, स्वरा तेरवणकर आणि रूद्रा सुर्वे यांचा समावेश होता. प्रमुख प्रशिक्षक राम कररा यांनी सूत्रसंचालन केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शशीरेखा कररा, गुरुप्रसाद सावंत, अमेय पाटील व सई सुवरे यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

८ अब्ज लोकांना लॅपटॉप देता येईल इतका काळा पैसा; CJI सूर्यकांत यांचं मनी लॉन्ड्रिंगवर भाष्य

Vaibhav Sooryavanshi ची विकेट पडताच संघ कोसळला; अवघ्या १०५ धावांत १० फलंदाज OUT, सामना २६६-२६६ असा बरोबरीत, पुढे काय?

स्टार प्रवाहवर नागीण बनली आणि माझं स्वप्न पूर्ण झालं! असं का म्हणाली 'मी कात टाकली'ची अभिनेत्री?

Zomato Rules: झोमॅटोवर बनावट पनीरला नो एंट्री! Analog Dairy पदार्थांवर बंदी; रेस्टॉरंट्ससाठी कडक नियम जारी

Prakash Ambedkar on Jarange: जरांगे यांच्या आंदोलनाचे केंद्र मुंबईऐवजी दिल्लीकडे - ॲड. प्रकाश आंबेडकरांचा दावा

SCROLL FOR NEXT