चिपळूण लायन्स आयडियलचा
पदग्रहण, चार्टर प्रदान सोहळा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३१ : लायन्स क्लब ऑफ चिपळूण आयडियलचा शपथविधी, पदग्रहण आणि चार्टर प्रदान कार्यक्रम नुकताच झाला. एमजेएफ जगदीश वाघुळदे यांच्या पुढाकाराने चिपळूण येथे नवीन क्लबची स्थापना करण्यात आली आहे.
या सोहळ्यात डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजेंद्र शहा (कासवा) यांच्या हस्ते लायन्स क्लब ऑफ चिपळूण आयडियलला अधिकृत चार्टर प्रदान करण्यात आले. या प्रसंगी चार्टर प्रेसिडेंट (अध्यक्ष) राजीव कांबळे, सचिव हर्षा वाघुळदे, सहसचिव डॉ. अविनाश चव्हाण पाटील, खजिनदार संतोष सावंतदेसाई, सहखजिनदार जतीन घटे यांची नव्याने निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमात मंगेश दोशी यांनी ‘इंडक्शन ऑफिसर’ म्हणून नव्या सदस्यांना सेवेची शपथ दिली तर डॉ. किरण खोराटे यांनी ‘इन्स्टॉलिंग ऑफिसर’ म्हणून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा केला. या नव्या क्लबच्या माध्यमातून आरोग्यसेवा, शिक्षण, महिला व बालकल्याण, पर्यावरण संवर्धन, रक्तदान शिबिरे आणि गरजू रुग्ण व विद्यार्थ्यांना मदत करण्याचा संकल्प करण्यात आला. या प्रसंगी लायन ॲड. विजय जमदग्नी, लायन श्रेया केळकर, रिजन चेअरमन लायन नीलेश पाटील, झोन चेअरपर्सन डॉ. शमिना परकार, डॉ. वीरेंद्र चिखले तसेच नागपूरचे पीडीजी चंद्रकांत सोनटक्के यांची प्रमुख उपस्थिती होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.