कोकण

नियमित खेळामुळे शरीर व मन सकारात्मक राहते

CD

खेळातून घडते व्यक्तिमत्त्व
शेखर निकम ः पवार महाविद्यालयात क्रीडा दिन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३१ : ‘विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच खेळालाही समान महत्त्व दिले पाहिजे. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत शारीरिक तंदुरुस्ती अत्यंत आवश्यक असून, नियमित खेळामुळे शरीर आणि मन दोन्ही सकारात्मक राहतात. विद्यार्थ्यांनी आपल्यातील क्रीडागुण ओळखून ते विकसित करावेत,’ असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी केले.
खरवते-दहिवली येथील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयात भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडादिनी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ‘खेळ जगा व खेळ जगवा’ असा प्रेरणादायी नारा दिला. या सोहळ्याला सह्याद्री शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष व चिपळूण-संगमेश्वर मतदार संघाचे आमदार शेखर निकम आणि संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात क्रीडा उपक्रमांना विशेष प्राधान्य दिले जाते. खेळ हा केवळ मनोरंजनाचा विषय नसून शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण व आत्मविश्वास वाढवणारे माध्यम आहे. ‘खेळ जगा व खेळ जगवा’ हा संदेश दैनंदिन जीवनाचा भाग बनावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati Irwin Hospital: रुग्णांच्या नातेवाइकांची आबाळ; एकाच प्रसाधनगृहाचा वापर; गलिच्छतेची मर्यादा पार

स्टार प्रवाहवर नागीण बनली आणि माझं स्वप्न पूर्ण झालं! असं का म्हणाली 'मी कात टाकली'ची अभिनेत्री?

Zomato Rules: झोमॅटोवर बनावट पनीरला नो एंट्री! Analog Dairy पदार्थांवर बंदी; रेस्टॉरंट्ससाठी कडक नियम जारी

गौतम गंभीरचा 'विश्वासू' चमकला; संघ संकटात असताना पठ्ठ्या उभा राहिला, श्रेयस अय्यरला वर्ल्ड कप २०२७ साठी टफ फाईट

Tea Price Hike: 'कटिंग' ला महागाईचा कट! साखर, दूध, गॅस, चहाच्या वाढत्या खर्चामुळे दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT