कोकण

बोलीभाषा संवर्धनात युवकांनी पुढाकार घ्यावा

CD

बोलीभाषा संवर्धनात युवकांनी पुढाकार घ्यावा
अरुण इंगवले ः चिपळूणमध्ये रंगले बोलीभाषा संमेलन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३१ : ‘बोलीभाषांचे जतन व संवर्धन करण्यासाठी सर्व अभ्यासकांनी एकत्र येऊन प्रचार-प्रसार केला पाहिजे. या कार्यात युवकांनी पुढे येऊन पुढाकार घ्यावा,’ असे आवाहन ज्येष्ठ कवी अरुण इंगवले यांनी केले.
मराठी साहित्य परिषद, विभा अरविंद ग्रंथालय आणि श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मोतीवाले परांजपे हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रत्नागिरी जिल्हा बोलीभाषा’ या विषयावर एक दिवसीय संमेलनावेळी ते बोलत होते. या संमेलनाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. प्राचार्य विजय कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करताना मराठी भाषेतील प्रा. यास्मीन शेख यांच्या योगदानाचा गौरव केला. या प्रसंगी संमेलनाध्यक्ष प्रा. संतोष पांडुरंग गोणबरे यांनी बोलीभाषेचे महत्त्व, भाषेची विविधता आणि संवर्धनातील तिच्या भूमिकेवर विस्तृत प्रकाश टाकला. तसेच ठाणे जनता बँकेचे व्यवस्थापक हृषिकेश लेले यांनी विद्यार्थ्यांनी दैनंदिन व्यवहारात इंग्रजीऐवजी बोलीभाषेतील शब्द वापरून भाषा समृद्ध करण्याचे आवाहन केले. इंगवले यांच्या अध्यक्षतेखालील या सत्रात विविध वक्त्यांनी कोकणातील बोलीभाषांवर मार्गदर्शन केले. यामध्ये प्रा. मनाली बावधनकर यांनी खारवी बोली, दुर्गेश आखाडे यांनी धनगरी बोली, अमोल पालये यांनी कुणबी बोली, मुझफ्फर सय्यद यांनी दालदी बोली, सुनील कदम यांनी कोळी बोली सादर केली. तसेच ‘लेखक आपल्या भेटीला’ या सत्रात लेखक राजा बर्वे यांनी त्यांच्या ‘इरसाल कोकण रंग’ या पुस्तकातील जिवंत व्यक्तिरेखांमधून बोलीभाषेचे महत्त्व पटवून दिले. तर प्रीतम खामकर यांनी ‘उंबरठ्यावरची दिवाळी’ ही कथा सादर केली.
या प्रसंगी प्राचार्य बाळासाहेब यादव, डॉ. उमेश बागल, धीरज वाटेकर, सुहास चव्हाण, बापू काणे, प्रा. विकास मेहेंदळे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रशांत देवळेकर यांनी स्वागत केले तर स्वागताध्यक्ष विजय कदम यांनी आभार मानले.
---
कवी संमेलन रंगले
प्रा. कैलास गांधी (दापोली) यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन रंगले. यात वेदिका हरवडे, वैष्णवी हळदे, रूपाली पाटील, माधुरी खांडेकर, विशाखा चितळे, सुनील कदम, मुझफ्फर सय्यद, विजय कदम, राष्ट्रपाल सावंत, संदीप परूळेकर, प्रा. संदीप येल्ये व प्रा. विक्रांत टेरवकर यांनी आपल्या बहारदार कविता सादर केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zomato Rules: झोमॅटोवर बनावट पनीरला नो एंट्री! Analog Dairy पदार्थांवर बंदी; रेस्टॉरंट्ससाठी कडक नियम जारी

गौतम गंभीरचा 'विश्वासू' चमकला; संघ संकटात असताना पठ्ठ्या उभा राहिला, श्रेयस अय्यरला वर्ल्ड कप २०२७ साठी टफ फाईट

Tea Price Hike: 'कटिंग' ला महागाईचा कट! साखर, दूध, गॅस, चहाच्या वाढत्या खर्चामुळे दरवाढीची शक्यता

Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! भरधाव ट्रॅव्हल्सची कंटेनरला धडक; एक ठार, १० प्रवासी गंभीर

ट्विंकल खन्नावर मुंढे इफेक्ट! तुकाराम मुंढेंनी हॉटेल चेक केलंय का…? आधी प्रश्न विचारला मग पनीर मागवलं, पुढे...

SCROLL FOR NEXT