rat३१p८.jpg-
26O60806
रत्नागिरी : भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रामध्ये आयोजित संस्कृत दिन कार्यक्रमात सहभागी संचालक डॉ. दिनकर मराठेंसह आदी.
----
काणे अध्ययन केंद्रात संस्कृत दिन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३१ : प्रत्येकजण सामर्थ्यपूर्ण आहे. संस्कृत भाषेला आताच्या काळात अधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. प्रत्येकजण विविध प्रकारे संस्कृत भाषेसाठी योगदान देण्यास सक्षम आहे. त्यामुळे संस्कृत भाषेच्या बळकटीकरणासाठी सर्वांनी आपले सामर्थ्य वाढवा, असे प्रतिपादन भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी केले.
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्रात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात उपकेंद्रातील लिपिक कल्पजा जोगळेकर यांनी संस्कृत गीत सादर केले. स्वरूप काणे यांनी संस्कृतमधून बातम्या सादर केल्या. प्रा. अविनाश चव्हाण यांनी संत एकनाथ यांच्या अभंगाचे निरूपण संस्कृतमधून केले. प्रा. कानिफनाथ पंढरे व प्रा. रिया बिष्ट यांनी योग व प्राणायामाचे प्रात्यक्षिक सूचनांसह संस्कृतमधून सादर केले. उपकेंद्रातील प्रकल्प साहाय्यक सई ओक आणि जान्हवी पाध्ये यांनी अनुक्रमे धर्मशास्त्र आणि संगीतशास्त्र यांच्यातील मतितार्थ संस्कृतमधून उलगडला. उपकेंद्रातील कक्ष अधिकारी प्रथमेश घोसाळे, कार्यालय साहाय्यक करण कीर व लिपिक अपर्णा कोकरे यांनी संस्कृत भाषेतून सुसंवाद साधला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.