कोकण

मंडणगडमध्ये दहीहंडीपूर्वी गोविंदांचा थरार

CD

-rat३१p६.jpg
26O60804
मंडणगड : सराव शिबिरात थर लावताना गोविंदा पथक.
----
गोविंदांच्या थरांनी वाढवला उत्साह
मंडणगडमध्ये सराव शिबिरे; गौरवगीताचे अनावरण
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ३१ : दहीहंडीचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असताना मंडणगडमध्ये गोविंदांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मानवी मनोऱ्यांचे थर रचत दहीहंडी फोडण्याची तयारी करणाऱ्या गोविंदांच्या सरावाने सापटेवाडी येथील दुर्गामाता मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
दहीहंडी उत्सवाची परंपरा आणि संस्कृती जपण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या ओम साई गोविंदा पथक, मंडणगडच्या स्थापनेला १५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शनिवारी (ता. ३०) दहीहंडी सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विविध गोविंदा पथकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत मानवी मनोरे रचण्याचा सराव केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी ओम साई गोविंदा पथकाच्या १५ वर्षांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या गौरवगीताचे अनावरण करण्यात आले. या अनावरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. यानंतर सहभागी गोविंदा पथकांनी दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर विविध थरांचे मानवी मनोरे रचण्याचा सराव केला. एकमेकांच्या खांद्यावर उभे राहत थरावर थर रचताना गोविंदांचा उत्साह, संघभावना आणि समन्वय लक्षवेधी ठरला. दहीहंडी फोडण्याच्या जिद्दीने गोविंदांनी विविध प्रकारच्या थरांचा सराव केला. सराव शिबिरात कन्हैया गोविंदा पथक, भिंगळोली; जय हनुमान गोविंदा पथक, पाट; अडखळ गोविंदा पथक तसेच श्री भैरवनाथ गोविंदा पथक, दुर्गवाडी यांनी सहभाग घेतला. पथकांच्या सरावामुळे मंदिर परिसरात दहीहंडीपूर्वी जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, नगराध्यक्ष ॲड. सोनल बेर्डे, नगरसेवक विनोद जाधव, अनिल रटाटे, दीप्ती घडशी, अप्पा मोरे, ॐ साई गोविंदा पथकाचे अध्यक्ष सचिन चांदिवडे, योगेश जंगम, आकाश सापटे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुढील ३ दिवस महत्त्वाचे! राज्यात पावसाचा जोर वाढणार, विजांच्या कडकडाटासह मुसळधारेचा अंदाज; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Inspirational Story: अनवाणी पायाने धावली आई! बीडमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी जिंकली मॅरेथॉन...

Jotiba Dongar News : ऊन सावली अन् विक्रमी गर्दीत रंगली जोतिबाची नगर प्रदक्षिणा...

Marathi News Live Updates : BPSC TRE 4 मधील ३२,३८८ रिक्त पदांसाठीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पुढे ढकलली

MS DHONI: धोनीने CSK मध्ये २५ टक्के हिस्सा मागितला? अखेर फ्रँचायझीने मौन तोडलं; माहीच्या IPL भविष्याबाबतही मोठं अपडेट

SCROLL FOR NEXT