कोकण

बसेस विलंबाने, प्रवाशांची गैरसोय

CD

एसटीचे वेळापत्रक कोलमडले
सुशांत सकपाळ ः खेडमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ३१ : खेड बसस्थानकातील अनागोंदी कारभाराचा फटका ग्रामीण भागातील प्रवाशांना बसत असून, उशिरा सुटणाऱ्या बसेसमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. विशेषतः शाळा-महाविद्यालय सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना बससाठी ताटकळत राहावे लागते. यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर झाला असून, एसटी प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे कोकण प्रदेश युवक अध्यक्ष सुशांत सकपाळ यांनी केली आहे.
ग्रामीण भागासाठी एसटी सेवा ही जीवनवाहिनी मानली जाते; मात्र अनेक मार्गांवरील बस नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुटत असल्याच्या तक्रारी आहेत. बस उशिरा मिळाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वेळापत्रक विस्कळीत होत असून, महिला व ज्येष्ठ नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. अंधार पडल्यानंतर विद्यार्थिनींना गावात उतरून घर गाठावे लागत असल्याने पालकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. एसटी कर्मचारी अथवा वाहकांच्या गैरवर्तनाबाबत तक्रारी असल्यास त्याची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सकपाळ यांनी केली आहे. ‘एसटी बस ही महिला आणि विद्यार्थिनींसाठी सुरक्षित प्रवासाचे माध्यम असले पाहिजे. महिलांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही,’ असा इशारा त्यांनी दिला.
-------
आरपीआयचा आंदोलनाचा इशारा
बसस्थानकाचा कारभार तातडीने सुधारून बससेवा वेळापत्रकानुसार सुरू करावी, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक फेऱ्या वाढवाव्यात आणि महिला सुरक्षेसाठी प्रभावी यंत्रणा उभी करावी. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आरपीआयच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सकपाळ यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुढील ३ दिवस महत्त्वाचे! राज्यात पावसाचा जोर वाढणार, विजांच्या कडकडाटासह मुसळधारेचा अंदाज; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Inspirational Story: अनवाणी पायाने धावली आई! बीडमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी जिंकली मॅरेथॉन...

Jotiba Dongar News : ऊन सावली अन् विक्रमी गर्दीत रंगली जोतिबाची नगर प्रदक्षिणा...

Marathi News Live Updates : BPSC TRE 4 मधील ३२,३८८ रिक्त पदांसाठीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पुढे ढकलली

MS DHONI: धोनीने CSK मध्ये २५ टक्के हिस्सा मागितला? अखेर फ्रँचायझीने मौन तोडलं; माहीच्या IPL भविष्याबाबतही मोठं अपडेट

SCROLL FOR NEXT