- rat१p१.jpg -
26O60985
चिपळूण - आगवे ग्रामपंचायत जिल्हा परिषद सदस्य पूजा निकम यांनी घेतलेली आढावा बैठक.
---
प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा
पूजा निकम ः आगवेत विकासकामांचा आढावा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १ : तालुक्यातील आगवे ग्रामपंचायत येथे जिल्हा परिषद सदस्या पूजा निकम यांनी भेट देऊन विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. या वेळी ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांशी संवाद साधत गावातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान गावातील प्रलंबित विकासकामे, शासकीय योजनांची अंमलबजावणी, पाणी व आरोग्यसुविधा, कृषी योजना, शाळेतील शैक्षणिक सुविधा आणि अंगणवाड्यांच्या सद्यःस्थितीची पाहणी करण्यात आली. तसेच १५ व १६व्या वित्त आयोगाच्या निधी नियोजनावरही विशेष चर्चा झाली.
विशेषतः २०२१ पासून प्रलंबित असलेल्या विविध विकासकामांवर बैठकीत सविस्तर मंथन करण्यात आले. आवश्यक त्या प्रशासकीय मान्यता घेऊन ही रखडलेली कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना निकम यांनी दिल्या. यामुळे गावातील प्रलंबित कामांना गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रसंगी निकम म्हणाल्या, ‘गावाच्या विकासासाठी उपलब्ध निधीचा योग्य व पारदर्शक पद्धतीने वापर करून नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवले जावेत. ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांच्या सहकार्याने आगवे गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.