कोकण

विजय गुजर नियोजन समितीवर

CD

- rat१p२.jpg -
26O60986
विजय गुजर

विजय गुजर यांची नियोजन समितीवर निवड
चिपळूण ः माजी सभापती विजय गुजर यांची रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाली आहे. चिपळूण तालुक्यातून या समितीवर निवड झालेले ते एकमेव सदस्य आहेत. यासाठी आमदार निकम यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. स्व. अजित पवार यांनी आमदार निकम यांना या संदर्भात शब्द दिला होता. स्व. अजित पवार यांच्या निधनानंतरही महायुती सरकारने तो शब्द पाळत ही निवड केली आहे. या मागणीसाठी आमदार निकम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री उदय सामंत, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार तटकरे यांच्याकडे विषय लावून धरला होता. या वेळी नियोजन समितीमध्ये चिपळूणला प्रतिनिधित्व मिळाले नव्हते; मात्र आमदार निकम यांच्या प्रयत्नांमुळे चिपळूणला पुन्हा संधी मिळाली आहे.


असुर्डे आंबतखोल विद्यालयात क्रीडादिन
सावर्डे असुर्डे -आंबतखोल (ता. चिपळूण) येथील वसंत शंकर देसाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला. सुरुवातीला मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक उदयराज कळंबे यांच्या हस्ते करण्यात आले. ध्यानचंद यांचे जीवनकार्य व हॉकी खेळातील योगदान या विषयीचा आढावा क्रीडाशिक्षक व्ही. पी. कांबळे यांनी घेतला. या प्रसंगी विद्यार्थ्यांचे मैदानामध्ये खेळांसाठी आवश्यक असणाऱ्या पूरक हालचालींचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या प्रसंगी मुला-मुलींची मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांकडून योगासने व सूर्यनमस्कार यांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Retirement Planning: 60 नाही, 43 व्या वर्षीच रिटायरमेंट! 85 लाखांचा फंड अन् 39 हजार भाडे, कपलचा प्लॅन नेमका काय?

का मोडला 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचा संसार? म्हणाली, 'एखाद्याला निघून जायचं असतं तेव्हा...'

मंगळ-बुधाचा विशेष योग! करिअर अन् पैशांच्या बाबतीत चमकणार ‘या’ राशींचे नशीब?

Palghar News: श्वानाच्या पिल्लाला बिबट्याचे अभय, बावड्या गावातील घटना सीसीटीव्हीत कैद

अमित ठाकरेंविरोधात BJP आक्रमक, माहीममध्ये भाजप-मनसे कार्यकर्ते आमनेसामने, पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT