कोकण

प्रत्येक तहसीलदारांना 10 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट

CD

तहसीलदारांना १० हजार वृक्षांचे लक्ष्य
मनुज जिंदल ः वृक्षारोपण मोहीम सनियंत्रण समिती बैठक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ : राज्यात ३०० कोटी वृक्षारोपण मोहिमेंतर्गत ३५ लाख ७७ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करून, ‘अमृत वृक्ष’ ॲपवर ऑनलाईन नोंदणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले. त्यानुसार प्रत्येक तहसीलदारांनी १० हजार वृक्षांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे, असे आदेशही देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली. बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील, मुख्याधिकारी वैभव गारवे, तहसीलदार राजाराम म्हात्रे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मनीषा जगदाळे आदी उपस्थित होते. सामाजिक वनीकरणचे विभागीय वनाधिकारी रणजीत गायकवाड यांनी सुरुवातीला सविस्तर माहिती दिली. जिल्हाधिकारी जिंदल यांनी सर्व विभागांचा आढावा घेतला. ते म्हणाले, प्रत्येकांनी वृक्ष लागवडीचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे तसेच त्याचे ऑनलाईन नोंदणी करावी. प्रत्येक तहसिलदारांनी १० हजार वृक्षांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे. नगरपंचायत, नगरपरिषद, मुख्याधिकारी यांनीही आपल्या क्षेत्रात वृक्ष लागवडीचे नियोजन करावे. शिक्षणाधिकारी यांनी शाळा परिसरात, एमआयडीसीने कारखाना परिसरात वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करा, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये लेझर लाईटवर बंदी; पुणे प्रशासनाचा मोठा निर्णय

Astrology: पुढच्या 48 तासांत बदलतीये ग्रह दशा! चमकणार 'या' राशींचे नशीब; धनलाभासह मिळतील मोठ्या आनंदाच्या बातम्या

Gas Cylinder : घरगुती वापराचा सिलिंडर, खाऊगल्लीत ‘सरेंडर’; शहरातील वाढत्या प्रकारांकडे भरारी पथकांचा काणाडोळा

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, मराठा आंदोलकांकडून शोले स्टाईल आंदोलन

Manoj Jarange Patil : उपाशीपोटी कोणी राहू नये म्हणून... आंतरवालीत 3 क्विंटल दाळबाटी!

SCROLL FOR NEXT