थल सैनिक कॅम्पसाठी
डीबीजेच्या तिघांची निवड
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २ : डीबीजे महाविद्यालयातील एनसीसी विभागाच्या १९ महाराष्ट्र बटालियन एनसीसी कराडच्या तीन विद्यार्थ्यांची ‘थल सैनिक कॅम्प (टीएससी) दिल्ली’साठी निवड झाली आहे. त्यात राज कदम, श्रेयस मानकर आणि अथर्व कदम यांचा समावेश आहे. हे तिन्ही छात्र टीएससी कॅम्प दिल्लीमध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत. महाविद्यालयाच्यावतीने या तिन्ही छात्रांचे अध्यक्ष मंगेश तांबे, सचिव अतुल चितळे व नियामक समिती सदस्य, प्राचार्य डॉ. माधव बापट, उपप्राचार्य डॉ. ऋचा खवणेकर, उपप्राचार्य डॉ. चेतन आठवले, रजिस्ट्रार विजयेंद्र जाधव यांनी अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना १९ महाराष्ट्र बटालियन एनसीसी कराडचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अजयकुमार सिंग, ॲडम ऑफिसर कर्नल के पद्मनाभन तथा सर्व पीआय स्टाफ एनसीसी ऑफिस कराड, मेजर नम्रता माने आणि लेफ्टनंट मधुसूदन माने यांचे या छात्रांना मार्गदर्शन लाभले.
----
‘गोविंदा स्पर्धे’त गोवळकोटचा झेंडा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण - शिवसेना, युवासेना व जय भवानी मित्र मंडळ घाणेखुंट ने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय तालुकाप्रमुख प्रो गोविंदा स्पर्धा फार उत्साहात झाल्या. हजारों नागरिकांनी यावेळी उपस्थित राहून पाच थरांचा व सेकंदाचा रोमांच अनुभवला. यामध्ये श्री गणेश गोविंदा पथक गोवळकोट प्रथम, खेमराज गोविंदा पथक हर्णे द्वितीय, श्री छत्रपती शिवाजी महाराज गोविंदा पथक मार्कंडी चिपळूण यांनी विजय मिळविला.
स्पर्धेत सहा गोविंदा पथकांनी सहभाग घेतला. प्रत्येक संघाचे दोन फेऱ्या घेण्यात आल्या. पहिली फेरी जाग्यावर कमी वेळेत पाच थर लावणे, दुसऱ्या फेरीत धावत येऊन पाच थर लावणे. यातील चार संघांची निवड झाली. विजेत्या संघाना रोख रक्कम, पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात आले. जय भवानी चे सदस्य विक्रम पवार यांनी याचे संपूर्ण नियोजन केले, त्यासाठी आकाश काते, किरण ठसाळे, विराज खेडेकर, अनिल राठोड, तुषार खताते, हृतिक पाष्टे, सोमदत्त खताते, रोशन खताते, कल्पेश पवार, मंदार खताते, निकुंज मोरे, राजू मोगरे, नीलेश काते, आदित्य नायनाक, परेश कलमकर, दिपांशु सिंग, सुजल पवार यांनी मेहनत घेतली. पंच म्हणून राज्यस्तरीय पंच आशुतोष साळुंखे व सहकारी तसेच समालोचक म्हणून बाळू सनगरे यांनी काम पाहिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.