-rat२p२.jpg -
26O61190
चिपळूण ः सावर्डे येथे महामार्गावर केलेले पॅचवर्क.
----
सावर्डे महामार्गाची ‘पॅचवर्क’ मोहीम
वाहनचालकांना दिलासा; प्रलंबित मागण्यांकडे लक्ष
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावर्डे परिसरातील धोकादायक खड्ड्यांची दुरुस्ती आणि खराब झालेल्या रस्त्याचे पॅचवर्क सध्या वेगाने सुरू आहे. याशिवाय महामार्गालगत वाढलेले गवत काढण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. प्रशासनाकडून धोकादायक ठिकाणांवरील दुरुस्ती व साफसफाई करण्यात आल्याने या मार्गावरील अपघाताचा धोका कमी झाला असून, वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
सावर्डे परिसरातील विविध नागरी समस्यांबाबत पंचायत समिती सदस्य शौकत माखजनकर आणि सावर्डे व्यापारी संघटनेने सतत पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून, प्रशासनाने प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात केली आहे; मात्र, काही कामे सुरू झाली असली तरी उर्वरित मागण्यांची पूर्तता अद्याप बाकी असल्याने नागरिकांचे लक्ष त्याकडे लागले आहे. त्याचबरोबर सावर्डे येथे आवश्यक ठिकाणी गतिरोधक उभारणे, सावर्डे येथील एसटी पिकअप् शेड व बसथांब्याची दुरुस्ती तसेच डेरवण येथील रुग्णालयाकडे जाणाऱ्या मार्गावरील आवश्यक सुधारणा ही कामे अजूनही प्रलंबित आहेत. या कामांवर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. या प्रश्नी झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी कामाचे आश्वासन दिल्यानंतर माखजनकर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांशी समन्वय साधला. व्यापारी संघटनेनेही या समस्या प्रशासनासमोर सातत्याने मांडल्या. तसेच दिव्यांग, महिला, बालके व ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांसह विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल ग्रामस्थांनी माखजनकर व सावर्डे व्यापारी संघटनेचे आभार मानले आहेत.
---
उर्वरित प्रश्न तातडीने मार्गी लावा...
सावर्डे परिसरातील सुरू असलेली कामे मुदतीत पूर्ण करून उर्वरित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी अपेक्षा पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.