‘एनसीएमसी कार्डा’साठी आगारांत गर्दी
दोन लाख प्रवाशांना लाभ ; मुदतवाढ मिळण्याची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : एसटी प्रवासात राज्यशासनाच्या विविध सवलतींचा लाभ मिळवण्यासाठी १ सप्टेंबरपासून ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एनसीएमसी) हे स्मार्टकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल दोन लाख प्रवाशांनी हे कार्ड घेतले असून, बसस्थानकांवर अजूनही प्रवाशांची प्रचंड धावपळ सुरू आहे. गर्दी आणि तांत्रिक विलंब लक्षात घेता प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी या निर्णयाला मुदतवाढ मिळण्याची शक्यता दाट वर्तवली जात आहे.
राज्य शासनातर्फे अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास तर सामान्य ज्येष्ठ नागरिक व महिलांना ५० टक्के भाडेसवलत दिली जाते. ही सवलत अधिक पारदर्शक करण्यासाठी एसटी महामंडळाने एनसीएमसी कार्ड सक्तीचे केले आहे. सध्या जिल्ह्यातील सर्वच आगारांत कार्ड काढण्यासाठी लांबच लांब रांगा लागत आहेत. काही ठिकाणी लोकप्रतिनिधींमार्फत शिबिरे घेतली जात असली तर काही ठिकाणी कार्डासाठी अधिक पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारींमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अद्याप मोठा नागरिक वर्ग या कार्डपासून वंचित असल्याने प्रशासनाकडून मुदतवाढीची घोषणा कधी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---
स्मार्टकार्डची वैशिष्ट्ये व प्रक्रिया:
* या कार्डमुळे देशभरातील मेट्रो, एसटी बस, रेल्वे, टोल व पार्किंगसाठी एकच कार्ड वापरता येईल.
* बनावट ओळखपत्रांद्वारे मिळवल्या जाणाऱ्या सवलतींना आळा बसणार असून, सवलतधारकांची अचूक नोंद राहील.
* एसटी स्थानकात अर्ज भरून ओळखपत्रांची कागदपत्रे, मोबाईल नंबर आणि ई-केवायसी पूर्ण करावी लागते.
* नवीन कार्डसाठी १९९ रुपये तर जुने कार्ड बदलण्यासाठी १४९ रुपये शुल्क आकारले जाते.
* अर्ज केल्यानंतर साधारण एका महिन्यात कार्ड मिळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.