कोकण

जि. प. शाळांसाठी खनिकर्मकडे सव्वासहा कोटीचा प्रस्ताव

CD

26O61242
एआय चित्र

शाळांच्या विकासासाठी खनिकर्म निधी
जिल्हा परिषदेच्या ९७ शाळांसाठी सव्वासहा कोटींचा प्रस्ताव ; दुरुस्तीसह नव्या वर्गखोल्या
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ ः जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरूस्ती, नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम, संरक्षण भिंती उभारणे आणि परिसराचे सुशोभीकरणासाठी जिल्हा परिषदेने खनिकर्म विभागाकडे ६ कोटी ३२ लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. शिक्षण विभागाने तयार केलेल्या विकास आराखड्यानुसार जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधील एकूण ९७ जिल्हा परिषद शाळांचा या प्रस्तावात समावेश केला आहे.
जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांच्या इमारती अत्यंत जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात छताला लागणारी गळती, खराब झालेले पत्रे, तुटलेली फरशी आणि शौचालयांची दुरवस्था यांमुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. याशिवाय काही शाळांमध्ये पटसंख्येच्या मानाने वर्गखोल्या अपुऱ्या पडत आहेत. ही समस्या सोडवण्यासाठी दुरुस्तीच्या कामांसोबतच गरजेनुसार नवीन वर्गखोल्या उभारण्यावर भर दिला जाणार आहे.
या निधीतून शाळांच्या छताची गळती थांबवणे, पत्रे बदलणे, फरशी व शौचालयांची दुरूस्ती, नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम, संरक्षण भिंती घालणे आणि शाळा परिसराचे सुशोभीकरण ही कामे केली जाणार आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण मुख्यत्वे जिल्हा परिषद शाळांवर अवलंबून असते; मात्र, भौतिक सुविधांच्या अभावामुळे आणि विशेषतः पावसाळ्यात वर्गखोल्यांमध्ये पाणी साचल्याने शैक्षणिक नुकसान होते. खनिकर्म विभागाकडून या प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी मिळाल्यास ९७ शाळांचा कायापालट होऊन विद्यार्थ्यांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि पोषक शैक्षणिक वातावरण उपलब्ध होणार आहे. चिपळूण तालुक्यातील १५ शाळांच्या दुरुस्तीसाठी ९३.५० लाख तर सात नवीन बांधकामांसाठी ४५.५० लाख रुपयांची तरतूद आहे.
दरम्यान, खाणकाम जिल्ह्यांमध्ये जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी जमा होतो. या निधीतील किमान ६० टक्के हिस्सा हा आरोग्य, पिण्याचे पाणी, पर्यावरण आणि शिक्षणासारख्या उच्च प्राधान्य क्षेत्रांवर खर्च करण्याचे निकष आहेत. त्यामुळे शिक्षणक्षेत्रातील विकासासाठी खनिकर्म विभागाचा निधी वापरता येतो.
---
तालुकानिहाय प्रस्तावित निधी आणि शाळांची संख्या:
तालुका*समाविष्ट शाळा*प्रस्तावित निधी
चिपळूण* २२* १ कोटी ३९ लाख
रत्नागिरी* १७* १ कोटी २३ लाख
संगमेश्वर* १५* १ कोटी २ लाख
राजापूर* १०* ७६ लाख
दापोली* ११* ६६ लाख
मंडणगड* ४* २४ लाख
खेड* ३* १६ लाख

Marathi News Live Updates : आमची लढाई कोणत्याही नेत्याविरोधात नाही, आम्हाला कोणालाही टार्गेट करायचं नाही: विनोद पाटील

Physiotherapy: आता फिजिओथेरपी फक्त उपचारांपर्यंतीच मर्यादित नाही! फिटनेस अन् दीर्घकालीन आरोग्यासाठीही ठरतेय महत्त्वाची

ENG vs PAK: निर्लज्ज कुठला! इंग्लंडकडून लाजीरवाणा पराभव अन् रिझवान दात काढत होता... नेटिझन्सन खळवले; Viral Video

ऑपरेशनसाठी १४ वर्षे प्रतीक्षेत, AIIMSमध्ये नंबर येण्याआधी १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; वडिलांचा मृतदेह घेण्यास नकार

Managutti Shivaji Maharaj Statue : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्याचे प्रकरण! महत्त्वाचा साक्षीदारच गैरहजर; पोलिस उपनिरीक्षकाविरोधात वॉरंट जारी

SCROLL FOR NEXT