rat२p१८.jpg -
६१२०८
रेयांश खामकर
एशियन स्कूल स्विमिंग स्पर्धेत
आरगावच्या खामकरला ५ पदके
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २ ः तालुक्यातील आरगाव येथील रेयांश खामकर याने थायलंड येथे झालेल्या एशियन ओपन स्कूल स्विमिंग चॅम्पियनशिप बँकॉक या स्पर्धेत चार रौप्य आणि एक कास्य अशा एकूण ५ पदकांची कमाई केली.
एशियन ओपन स्कूल स्विमिंग स्पर्धा २९ आणि ३० ऑगस्ट रोजी पार पडली. या स्पर्धेत रेयांशने २५ मीटर बटरफ्लाय, ५० मीटर बटरफ्लाय, ५० मीटर बॅकस्ट्रोक आणि ५० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात रौप्यपदक तर १०० मीटर फ्रीस्टाइल जलतरण स्पर्धेत कास्यपदक पटकावले. रेयांशला स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनचे प्रशिक्षक कैलास आखाडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. लहान वयात त्याने जलतरण स्पर्धा गाजवली आहे. जलतरणमधील चमकदार कामगिरीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने यापूर्वीच नोंद घेतलेली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देखील रेयांशचा सत्कार करण्यात आला होता. गतवर्षी सिंधुदुर्ग येथे झालेल्या सागरी जलतरण स्पर्धेत अवघ्या ७ वर्षे २ महिन्याच्या रेयांशने अरबी समुद्रात ३० किलोमीटरचे अंतर ७ तास ३० मिनिटे ११ सेकंदात पूर्ण केले होते. अशी कामगिरी करणारा जगातील सर्वात लहान जलतरणपटू होण्याचा विश्वविक्रम त्याने केला आहे. त्याचे पंचायत समिती सदस्य चंद्रकांत तथा दादा खामकर, भाजपा तालुकाध्यक्ष शैलेश खामकर, जिल्हा बँक संचालक महेश खामकर यांनी अभिनंदन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.